PTI
राष्ट्रीय

नीरवची ३० कोटीची मालमत्ता जप्त

हजारो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची सुमारे २९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : हजारो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची सुमारे २९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याच्यावर तेथील कोर्टात खटला सुरू आहे.

मोदी याने पंजाब नॅशनल बँकेमध्ये ६ हजार ४९८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून तो लंडन येथे पळून गेला होता. या प्रकरणी तपास सुरू असून ईडीने मोदी याच्या भारतातील आणखी काही मालमत्ता शोधून काढल्या आहेत़ या मालमत्तांमध्ये जमीनी, इमारती आणि बँकांमधील पैशांचा समावेश आहे. मोदी आणि त्याच्या कंपनीशी निगडित आणखी काही मालमत्ता याआधी ईडीने जप्त केलेल्या आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स