सन २००५-०६ मधील नोएडातील सिरियल मर्डर केसप्रकरणी(निठारी हत्याकांड) प्रमुख संशयीत आरोपी सुरिंदर कोळी आणि मोनिंदर सिंह रंढेर या दोघांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या दोघांना कोर्टाने निर्दोष ठरवलं असून त्यांची फाशीची शिक्षा देखील रद्द करण्यात आली आहे.
भारताच्या इतिहासात अलिकडच्या काळातील निठारी हत्याकांड हे सर्वात भयानक गुन्हेगारी प्रकरण आहे. याममध्ये सुरिंदरर कोळीवर अमानुषपणे बालकांना ठार करत त्यांचं मृत शरीराचे करवतीनं कापून त्याचे तुकडे नोएडातील निठारी येथे मोनिंदर सिंह पंढेरच्या घराच्या आवारात पुरले होते. सन २००६ साली समोर आलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.
या प्रकरणात सत्र न्यायालयाने कोळी याला दोषी ठरतव फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारी २०११ रोजी यावर शिक्कामोर्तब केलं होते. याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला कोळी हा सिरियल किलर असल्याने दिसत असल्याचं ग्राह्य धरुन त्याला कोणातीही दया मया दाखवली जाऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. कोळीवर एकून १६ गुन्हे दाखल असून १२ प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
निठारी हत्याकांडातून उद्दभवलेल्या काही प्रकरणात त्याता मालक मोनिंदर सिंह पंढेर दोषी ठरला होता. तर काहींना निर्दोष सोडण्यात आलं होतं. पंढेर यांनी दोन खटल्यात ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.