राष्ट्रीय

नितीश सरकारचा दुसरा मास्टरस्ट्रोक ; आरक्षणाची मर्यादा ६५ टक्के करणाऱ्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

काही दिवसांपूर्वी नितीश सरकारने बिहारमधील जातीनिहाय जनगनेची आकडेवारी जाहीर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

नवशक्ती Web Desk

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातारवण तापलं असताना बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाच्या दुरुस्तीला बिहार विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठीचं विधेयक विधानसभेसमोर ठेवण्यात आलं होतं. बिहारच्या कॅबिनेटने बुधवारी इतर मागास जमाती, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे.

बिहारच्या विधानसभेत घेतलेल्या या निर्णयामुळे आता बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन ६५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. १० टक्के आरक्षण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणार आहे. त्यामुळे बिहार राज्यात आरक्षणाचा कोटा हा ७५ टक्के होणार आहे. बिहार सरकारच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या ५० टक्के मर्यादेच मात्र उल्लंघन होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितीश सरकारने बिहारमधील जातीनिहाय जनगनेची आकडेवारी जाहीर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश