राष्ट्रीय

जुन्या कर रचनेबाबत कोणताही निर्णय नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

जुन्या कर रचनेबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. कर रचना सोपी व सुटसुटीत असावी, अशी आमची भूमिका आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन अर्थसंकल्पात नवीन कर रचनेत सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे जुन्या कर प्रणाली बंद करणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, ‘जुन्या कर रचनेबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. कर रचना सोपी व सुटसुटीत असावी, अशी आमची भूमिका आहे.

मध्यमवर्गीयांना करांबाबत दिलासा मिळेल, अशी आशा होती. त्याप्रमाणे अर्थमंत्री सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना प्राप्तिकरात नवीन बदल केले आहेत. ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. नवी कररचना आणि जुनी कररचना अशी दोन्ही स्वीकारलेल्या करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

पुढील वर्षी जुनी कर प्रणाली बंद करण्यात येईल का ? यावर त्या म्हणाल्या की, आम्ही त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. जुन्या कर रचनेबाबत मी आत्ता सांगू शकत नाही. मात्र कररचना ही साधी आणि सोपी असली पाहिजे. त्यामुळे आम्ही त्या दिशेने पाऊल टाकले आहे. आमचा उद्देश हाच आहे की, जुन्या कररचनेच्या मार्गावरच ही नवी कररचना प्रणाली आम्ही आणली आहे. आम्ही आढावा घेतल्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ. आता आम्ही तूर्तास कुठलाही निर्णय घेतलेला नाही.” असे त्या म्हणाल्या.

नवी कर प्रणाली जनतेला आवडते आहे. तरीही अनेक लोक जुन्या कर प्रणालीत जनतेचा काय कौल आहे त्याचा आम्ही आढावा घेऊ, असे म्हणत त्यांनी जुनी कररचना बंद करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

Mumbai: धक्कादायक! लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून