ओदिशामध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस उलटून ५ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी X
राष्ट्रीय

ओदिशामध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस उलटून ५ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी

ओदिशामध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर पाच जणांना भुवनेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Swapnil S

नयागढ (ओडिशा) : ओदिशामध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर पाच जणांना भुवनेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नयागढमधील दसपल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिठाखाई खोऱ्याजवळ 'माँ सिंहेश्वरी' नावाची एक खासगी पर्यटक बस पलटी होऊन अपघात झाला. दरम्यान, ही बस बरहमपूरहून बलांगीर येथील हरिशंकर मंदिराकडे जात होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस गंजम जिल्ह्यातील बरहमपूर भागातील ५५ भाविकांना बलांगीर जिल्ह्यातील हरिशंकर आणि नृसिंहनाथ मंदिरांना भेट देण्यासाठी घेऊन जात होती. बस शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता बरहमपूरहून निघाली होती. यादरम्यान, पहाटे दोनच्या सुमारास पिठाखाई दरी ओलांडताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

तपास सुरू

या अपघातानंतर स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना दसपल्ला येथील रुग्णालयात दाखल केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी नयागढ जिल्हा मुख्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघाताचा तपास दसपल्ला पोलिसांनी करत आहेत. चालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गंभीर जखमींना भुवनेश्वरला हलवण्यात आलं आहे.

सर्व प्रवासी बरहमपूर भागातील

आम्ही बरहमपूरहून निघून बलांगीर येथील हरिशंकर मंदिरात जात होतो. रस्त्यावरील वळणावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना बस उलटली. दरम्यान, एल हरी पात्रा, लक्ष्मी पात्रा, सुप्रभा साहू, सुमंती साहू आणि बस चालक प्रवीण कुमार साहू अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे सर्व बरहमपूर भागातील आहेत. तसेच हे प्रवासी 'माँ तारिणी टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स'द्वारे आयोजित केलेल्या ११ ठिकाणांच्या तीन दिवसीय सहलीवर होते.

Mumbai : आजपासून मिठी नदीतील गाळ उपसणार; अखेर कंत्राटदाराची नियुक्ती

राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक

विवाहित पुरुष आणि प्रौढ महिला यांचे लिव्ह-इन-रिलेशन हा गुन्हा नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

वेळेत भूसंपादन न झाल्यास जमीन मालकाचीच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा