राष्ट्रीय

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांपुढे मांडली ‘पंचप्राण’ संकल्पना

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोमवारी देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वृत्तसंस्था

आगामी २५ वर्षांमध्ये भारत हा विकसित देश म्हणून ओळखला जाण्यासाठी ‘पंचप्राण’ ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांपुढे मांडली. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी भ्रष्टाचार, घराणेशाही संपवण्याचा निर्धार केला व त्यासाठी मला जनतेची साथ हवी, असे आवाहन केले.

देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोमवारी देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात तिन्ही संरक्षण दलांनी आपल्या ताकदीचे दर्शन घडवले. यावेळी २१ तोफांची सलामीही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. मोदींनी लाल किल्ल्यावरून लागोपाठ नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला व जवळपास ८३ मिनिटे भाषण केले. यावेळी त्यांनी ‘पीएम समग्र स्वास्थ्य मिशन’ या नवीन नावाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विस्ताराचाही उल्लेख केला. तसेच गांधी, नेहरू, सावरकर यांचेदेखील त्यांनी स्मरण केले.त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. काही लोकांना तुरुंगात डांबले आहे. ज्या लोकांनी देशाला लुटले आहे, त्यांना ते परत करावे लागेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करत आहोत,” असे मोदी म्हणाले. “घराणेशाही हादेखील एक मुद्दा आहे. राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे. याच कारणामुळे माझ्या देशाचे सामर्थ्य, बुद्धिमत्तेला नुकसान पोहोचत आहे. घराणेशाहीमुळे गुणवत्तेला वाव मिळत नाही. घराणेशाही, परिवारवाद हादेखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतोय. घराणेशाहीविरोधात आपल्याला जागरूकता निर्माण करावी लागेल. संस्थांना वाचवायचे असेल तर आपल्याला हे करावे लागेल,” असे ते म्हणाले.

राजकारण, घराणेशाही, भ्रष्टाचार संपवायला हवा

“देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाही समूळ नष्ट करावी लागेल. भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी जनतेने मला साथ द्यावी,” असे आवाहन करून ते म्हणाले की, “मागील सरकारच्या काळात जे लोक बँकांना लुटून देश सोडून गेले आहेत, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारतात काही लोक गरिबीशी लढत आहेत. काही लोकांकडे राहण्यासाठी घर नाही. तर दुसरीकडे काही लोकांकडे चोरी केलेला माल लपवण्यासाठी जागा नाही. हे योग्य नाही. याच कारणामुळे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहे. आधार कार्ड, मोबाइल या आधुनिक साधनांचा वापर करून चुकीच्या लोकांच्या हातात जाणारे दोन लाख कोटी रुपये वाचवण्यात आम्हाला यश आले. मागील सरकारमध्ये जे लोक बँकांना लुटून पळून गेले

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी