राष्ट्रीय

पी. व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था

दोन वेळा ऑलिम्पिकचे पदक मिळविणाऱ्या भारताच्या पी. व्ही सिंधूने शुक्रवारी वर्ल्ड चॅम्पियन अकाने यामागुची हिला २१-१५, २०-२२, २१-१३ असे नमवून थायलंड ओपन २०२२ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सिंधू आणि यांच्यातील या २३व्या लढतीत सिंधूने १४वा विजय साजरा केला. सिंधूने दक्षिण कोरियाच्या सिम यू जिन हिला २१-१६, २१-१३ ने हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

याआधी, महिला एकेरीत मालविका बनसोडेचे आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसन हिच्याकडून तिचा २१-१६, १४-२१, १४-२१ असा पराभव झाला. ईशान भटनागर आणि तनीषा क्रास्टो या भारताच्या जोडीला मिश्र दुहेारीत पराभव पत्करावा लागला. त्यांना गोह सून हुआत आणि लेई शेवोन जेमी या मलेशियाच्या सहाव्या मानांकित जोडीकडून १९-२१, २०-२२ असे पराभूत व्हावे लागले. अश्विनी भट के आणि शिखा गौतम यांच्या जोडीला महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत मायु मात्सुमोतो आणि वकाना नागाहारा या पाचव्या मानांकित जोडीकडून १९-२१, ६-२१ असा पराभव पत्करावा लागला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक