राष्ट्रीय

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र, यावेळी कारण चित्रपट किंवा त्याचा शो नाही, तर पाकिस्तान सरकारचा निर्णय आहे. पाकिस्तानने सलमान खानला अधिकृतपणे 'दहशतवादी' म्हणून घोषित केलं असून त्याचं नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या ‘चौथ्या अनुसूची’त (4th Schedule) समाविष्ट केलं आहे.

नेहा जाधव - तांबे

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र, यावेळी कारण चित्रपट किंवा त्याचा शो नाही, तर पाकिस्तान सरकारचा निर्णय आहे. पाकिस्तानने सलमान खानला अधिकृतपणे 'दहशतवादी' म्हणून घोषित केलं असून त्याचं नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या ‘चौथ्या अनुसूची’त (4th Schedule) समाविष्ट केलं आहे.

काय घडलं नेमकं?

सलमान खान नुकताच सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या ‘जॉय फोरम २०२५’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाला होता. या मंचावर त्याच्यासोबत शाहरुख खान आणि आमिर खानही उपस्थित होते. मध्यपूर्वेतील प्रेक्षकांमध्ये भारतीय चित्रपटांची वाढती लोकप्रियता सांगताना सलमान म्हणाला, “इथे बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील लोक आहेत. सगळे एकत्र काम करत आहेत.”

याच वक्तव्यावरून वाद पेटला. सलमानने 'बलुचिस्तान' आणि 'पाकिस्तान' यांचा स्वतंत्र उल्लेख केल्याने पाकिस्तानमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली. अनेकांनी हे वक्तव्य 'पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर थेट प्रहार' असल्याचं म्हटलं.

पाकिस्तानचा कठोर निर्णय

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमान खानविरुद्ध कठोर कारवाई करत त्याचं नाव १९९७ च्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या अनुसूचीत समाविष्ट केलं आहे. या यादीत समाविष्ट व्यक्तींवर सतत पाळत ठेवली जाते, त्यांची हालचाल मर्यादित केली जाते आणि देशात प्रवेश किंवा आर्थिक व्यवहारांवरही निर्बंध येतात. म्हणजेच, पाकिस्तानच्या भूमीत सलमान खान आता 'वॉच लिस्टवरील दहशतवादी' मानला जाणार आहे.

बलुचिस्तानकडून समर्थन

या प्रकरणात वेगळा कल दिसून आला आहे. बलुचिस्तानमधील फुटीरतावादी नेत्यांनी सलमान खानच्या वक्तव्याचं स्वागत केलं आहे. स्वातंत्र्य चळवळीचे नेते मीर यार बलोच यांनी एका पोस्टद्वारे म्हटलं, “भारतीय अभिनेता सलमान खानने बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख करून आमच्यासाठी आवाज उठवला आहे. ६ कोटी बलोच नागरिक त्याचे आभारी आहेत.” त्यांनी पुढे म्हटलं की, “जगातील मोठ्या देशांनाही हे बोलायला धाडस होत नाही, पण सलमानने जे केलं ते ऐतिहासिक आहे.”

बलुचिस्तान प्रश्न काय आहे?

बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे, जो देशाच्या गॅस उत्पादनात जवळपास ४० टक्के योगदान देतो. तरीही तिथल्या लोकांच्या मते, इस्लामाबादने त्याकडे कायम दुर्लक्ष केलं. १९४८ मध्ये पाकिस्तानमध्ये विलीन झाल्यापासून बलोच लोक आपली स्वतंत्र ओळख आणि हक्कांसाठी लढत आहेत. या संघर्षामुळे अनेक वेळा तणाव आणि हिंसाचारही घडला आहे.

सलमानकडून अद्याप मौन

या सर्व गदारोळानंतरही सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आता त्यावर सलमान स्वतः काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन

कळवा रुग्णालयात गर्भवतींची गैरसोय; २५ बेड क्षमता असताना ३२ महिला दाखल; ८ प्रतीक्षेत