PM
राष्ट्रीय

Video : मुंबईच्या लोकलपासून विमानापर्यंत गजर श्री रामाचा, भक्तीत लीन झाले प्रवासी

Swapnil S

आज संपूर्ण देशभरात भक्तीमय वातावरण आहे. केंद्र शासनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी शहरे, रस्ते सजवण्यात आले आहेत. मंदिरांमध्ये भजन, कीर्तन सुरु आहेत.

कामानिमित्त घराबाहेर जावे लागणाऱ्या भाविकांमध्ये हा उत्साह कायम दिसतोय. मुंबईकर चाकरमानी लोकलमध्ये प्रभू श्री रामाचा भजन कीर्तन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचवेळी दिल्लीहून अयोध्येला जाणाऱ्या विमानातील प्रवासीही रामाच्या भक्तीत लीन झाल्याचे दिसले. विमानातील प्रवाशांनी प्रभू श्रीरामाचे भजन गायले. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

IndiGo फ्लाइटमध्ये भजन-

दिल्लीहून अयोध्या जाणाऱ्या विमानात भाविक आणि प्रवासी श्रीरामाची भजने गात आहेत. इंडिगोच्या विमानात राम भजनावर भाविक ठेके धरत आहेत. 'राम सिया राम'ची धून गाताना लोक दिसत आहे. व्हिडिओत भगवे वस्त्र परिधान करणारा एक भाविक राम भजन म्हणत आहे. त्याला विमानात बसलेले इतर लोक देखील प्रतिसाद देत आहेत.

मुंबई लोकलमध्ये राम धून-

मुंबईत सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. परंतु मुंबई नेहमीप्रमाणे धावत आहेत. यावेळी लोकलमध्ये राम भजने गाताना मुंबईतील चाकरमानी दिसले. विरारवरुन चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भगवान श्री रामाचे पोस्टर लावून मुंबईकर भजने गाताना दिसत आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त