राष्ट्रीय

पवारांची नवी मुंबईतही पाऊस सभा देशाच्या ऐक्यासाठी संघर्ष करत राहू -पवार

प्रतिनिधी

नवी मुंबई : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत साताऱ्यात भरपावसात सभा घेणाऱ्या शरद पवार यांनी रविवारी पुन्हा नवी मुंबईत भरपावसात सभा घेतली. यावेळी देश प्रगती करत असताना काही घटक देशात अराजकता निर्माण करत आहेत. पण, देशाच्या ऐक्यासाठी संघर्ष करत राहू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नवी मुंबई येथे केले.

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसने महिला मेळाव्याचे आयोजन नेरूळ येथे केले होते. यावेळी २०० पेक्षा अधिक बचत गट आणि शेकडो महिलांची उपस्थिती मेळाव्याला लाभली होती. मेळावा सुरू झाला, त्यावेळी पाऊस सुरू झाला. मात्र, शरद पवार हे भरपावसात भाषण देत राहिले. यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे उपस्थित होते.

साताऱ्याच्या सभेची आठवण

अजित पवार यांच्या बंडानंतर नवी मुंबईत पहिलाच राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा आयोजित केला होता. संध्याकाळी पाऊस आणि वादळी वारे सुरू झाल्याने स्थानिक कार्यकर्ते हिरमुसले. मात्र, भरपावसात शरद पवार आले आणि त्यांनी भाषण सुरू केले. २०१९ च्या निवडणूक प्रचारावेळी साताऱ्यातही जोरदार पाऊस सुरू असताना भरपावसात पवार यांनी जोरदार भाषण केले. ही आठवण आज ताजी झाली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस