राष्ट्रीय

शिवसेना भवन आणि शिवसेना निधी शिंदे गटाला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका

प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह शिंदे गटाच्या नावावर केले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका केली आहे की, शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा. या वकिलाचे नाव आशिष गिरी असून ते कोणत्याही गटाचे कार्यकर्ता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वकील आशिष गिरी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, "एकनाथ शिंदेंना सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसेना भवन, शिवसेना निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्यात. तसेच, न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे." असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, "मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसून मी दाखल केलेल्या याचिकेचा शिंदे गटाशी काहीही संबंध नाही. एक वकील आणि एक मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली असून मी कायद्याच्याच बाजूने आहे. समजा जर आगामी काळात न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर हे सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध घालण्यात यावे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम