राष्ट्रीय

हिमाचलमध्ये पिकअप दरीत कोसळली; ६ मजुरांचा मृत्यू, तर ६ जण जखमी

नवशक्ती Web Desk

हिमाचल येथील शिमल्यात मजदुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा मोठा अपघात झाला आहे. या अपघात ६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी मुजरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाची माहिती मिळताच घटनास्थळी मदतीसाठी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. हा अपघात कोणत्या कारणाने झालं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

अपघातात जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी सुन्नी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिमला एएसपी नवदीप सिंह यांनी घटलेना दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीवरुन, राजधानी शिमल्यापासून ५० किमी अंतरावर मंडी जिल्ह्याच्या सीमेवर सुन्नी शहर आहे. या ठिकाणच्या कादरघाट येथे हा अपघात झाला आहे. अपघातात ३ लोकांचा जागीच मृत्यू झाला तर ती जणांचा उपचारादरम्यान सुन्नी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर इतर ६ जण यात जखमी झाले आहेत. सोमवरी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

हिमाचलमधील सुनी ते किंगल जोडणाऱ्या लिंक रोडवर आज सकाळी ७ वाजता हा अपघात झाल्याचं सांगतिलं जात आहे. पिकअपमध्ये चालकासह १२ जण कडाघाटातील बाजाराकडे जात होते. कादरघाटापासून काही अंतरावर पिकअप खोल दरीत पडली. या अपघाताची माहिती स्थानिक लोकांनी दिल्यानंतर पोलीस आणि स्थानिक आणि पोलिसांनी मिळून अपघात ग्रस्तांना सुन्नी हॉस्पिटलमध्ये नेलं.

मुंबई कुणाची? राज्यातील १३ मतदारसंघांत मतदान; महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस

राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत गोंधळ; भाषण न करताच निघून जाण्याची पाळी

काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दहशतवादी हल्ले; भाजप कार्यकर्त्याची हत्या

तेव्हा कुणालाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते; ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा दावा

मतदान टक्केवारी जबाबदारी केवळ मतदारांची नाही!