एक्स @narendramodi
राष्ट्रीय

मोदी - जे. डी. व्हान्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी व्हान्स कुटुंबीयांचे स्वागत केले.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी व्हान्स कुटुंबीयांचे स्वागत केले.

या चर्चेत यंदा पॅरिसमध्ये झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी व उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. ऊर्जा, संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान आदींमध्ये सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. विभिन्न क्षेत्रीय व जागतिक मुद्द्यावर आपापसातील हित त्यांनी एकमेकांसमोर मांडले.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची आपण प्रतीक्षा करत असल्याचे मोदी यांनी सांगितले. या बैठकीनंतर प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली. भारत व अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठीची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव