राष्ट्रीय

दहशतवाद्यांच्या गोळीबारात पोलीस अधिकारी जखमी

पोलीस निरीक्षक मसरूर वाणी हे ईदगाह मैदानात स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत होते.

नवशक्ती Web Desk

श्रीनगर : येथे एका पोलीस अधिकाऱ्याला दहशतवाद्यांनी रविवारी गोळ्या घातल्या. यात हा अधिकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस निरीक्षक मसरूर वाणी हे ईदगाह मैदानात स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. या हल्ल्यानंतर परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार