पूजा खेडकर
राष्ट्रीय

पूजा खेडकरला झटका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

बडतर्फ प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला.

Swapnil S

नवी दिल्ली : बडतर्फ प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. पूजा खेडकरने केलेली फसवणूक ही केवळ त्या संस्थेची फसवणूक नसून संपूर्ण समाजाची फसवणूक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात गेलेल्या पूजा खेडकरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याचे वर्तन समाजातील वंचित गटांना दिलेल्या योजनेचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे. ते वंचित गटांच्या फायद्यासाठी नसल्याचे तपासातून दिसून आले आहे.

न्यायालयाने म्हटले की, पूजा खेडकर हिने उचललेली पावले व्यवस्थेत फेरफार करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग होती. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. फसवणुकीचे हे उत्कृष्ट उदाहरण केवळ घटनात्मक संस्थेचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा विश्वासघात करते. दिल्ली उच्च न्यायालयाने पुढे सांगितले की, कट उघड करण्यासाठी तपासाची गरज आहे. माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचा लाभ चुकीच्या पद्धतीने मिळवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

खेडकरला अटक होणार?

खेडकरला देण्यात आलेले अंतरिम संरक्षण काढून घेण्यात आल्याने तिला अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत