राष्ट्रीय

'मी जिवंत आहे', पूनम पांडेने जारी केला Video; स्वतःच्या मृत्यूची बातमी पसरवण्याचं कारणही सांगितलं; नेटकरी भडकले

'मी जिवंत आहे, सर्वाइकल कॅन्सरमुळे माझा मृत्यू झाला नाही', असे सांगत मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिने स्वतःच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Swapnil S

'मी जिवंत आहे, सर्वाइकल कॅन्सरमुळे माझा मृत्यू झालेला नाही', असे सांगत मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिने स्वतःच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शुक्रवारी पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरूनच तिचा मृत्यू झाल्याची पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पण, आता एक नवीन व्हिडिओ शेअर करीत पूनमने स्वतःच्या 'मृत्यूची बातमी' हा गर्भाशयाच्या कर्करोगाच्या (सर्वाइकल कॅन्सर) लसीबाबत प्रचार करण्यासाठी केलेला प्रसिद्धी स्टंट होता असे स्पष्ट केले आहे. पूनम जिवंत असल्याचे समोर आल्यामुळे तिच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

शनिवारी दुपारी, पूनमने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, गर्भाशयाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला नसला तरी, या आजाराने शेकडो-हजारो महिलांचा बळी घेतला आहे, या आजाराबाबत जागरुकता पसरवण्याचा उद्देश होता, असे तिने सांगितले. ज्यांचा या आजारामुळे बळी गेला त्यांना काय उपाय करायचे हेच माहित नसते म्हणून त्यांना जीव गमवावा लागतो, असे ती म्हणाली. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाचा कर्करोग देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही याची खात्री करण्याचे साधन आपल्याकडे आहे. अशा अनेक गोष्टी या आजारापासून वाचण्यासाठी करता येतात. जागरुकतेने एकमेकांना सशक्त करूया आणि या आजारापासून वाचण्यासाठी काय करावं लागतं याची माहिती प्रत्येक स्त्रीला मिळेल याची खात्री करूया, चला एकत्रितपणे रोगाच्या विनाशकारी परिणामांचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया, असे ती पुढे म्हणाली.

नेटकरी भडकले

पूनमने व्हिडिओ शेअर करताच आणि ती खरोखरच जिवंत असल्याचे उघड होताच, नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. स्वतःच्या मृत्यूच्या बातमीचा वापर पब्लिसिटी स्टंटसाठी केल्यामुळे नेटकरी भडकले आहेत. एखाद्या गोष्टीबाबत जागरुकता पसरवण्यासाठी किंवा प्रचारासाठी केलेला हा घाणेरडा आणि सर्वात वाईट स्टंट होता, तिला अटक करा, अशा प्रतिक्रिया तिच्या व्हिडिओखाली अनेकजण देत आहेत.

दरम्यान, एक दिवसापूर्वीच, "आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की गर्भाशयाच्या कर्करोगामुळे लाडक्या पूनमला गमावले आहे, अशी पोस्ट पूनमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या टीमच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर, पूनमचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. तिने अखेरचा श्वास घेतला तेव्हा ती तिच्या मूळ गावी कानपूरमध्ये होती, असेही तिच्या टीमने सांगितले होते. मात्र, हा सगळा सर्वाइकल कॅन्सरबाबत जागरुकता पसरवण्यासाठी केलेला प्रसिद्धी स्टंट होता असे आता स्पष्ट झाले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत