राष्ट्रीय

प्रज्वलच्या आमदार भावालाही लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक

लैंगिक अत्याचार आणि सेक्स स्कँडल प्रकरणात जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला अटक करण्यात आलेली असतानाच आता त्याचा सख्खा भाऊ सुरज रेवण्णालाही लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक झाल्याने कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे.

Swapnil S

बंगळुरू : लैंगिक अत्याचार आणि सेक्स स्कँडल प्रकरणात जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला अटक करण्यात आलेली असतानाच आता त्याचा सख्खा भाऊ सुरज रेवण्णालाही लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक झाल्याने कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे. जेडीएस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विधानपरिषदेचा आमदार असलेल्या सुरज रेवण्णाला अटक केली.

हासन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील पोलीस ठाण्यात सुरजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जून रोजी सुरज रेवण्णाने सदर पीडित कार्यकर्त्याला फार्महाऊसवर बोलावले व तेथे त्याच्यावर लैंगिक बळजबरी करण्यात आली. तसेच त्याला मारहाणही करण्यात आली. पीडित तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७७ अंतर्गत अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा सुरजविरुद्ध दाखल केला.

पीडित तरुणाने तक्रारीत म्हटलेय की, सुरजने लैंगिक अत्याचार केल्यानंतर मला राजकारणात चांगले पद देण्याचे आणि माझे राजकीय बस्तान बसविण्याचे आमिष दाखविले. या घटनेनंतर त्याने सुरजला मेसेज करून याबाबत विचारणा केली. तेव्हा सर्व काही ठिक होईल, अशा शब्दांत सुरजने आश्वस्त केले होते.

सुरज रेवण्णाकडून पीडित तरुणाविरुद्ध उलट तक्रार

दरम्यान, शनिवारी सुरज रेवण्णा आणि त्याचा सहकारी शिवकुमार यांनी पीडित तरुणाच्या विरोधातच धमकावणे आणि खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला. लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करून तुम्हाला बदनाम करू, अशी धमकी पीडित तरुणाने दिली असल्याचे रेवण्णाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

GR वरून रणकंदन! शासन निर्णय सरसकटचा नाही, खऱ्या कुणबींनाच आरक्षण- मुख्यमंत्री; मराठा समाजाला काहीही नवे मिळाले नाही - विनोद पाटील

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण