PTI
राष्ट्रीय

आगीत पुस्तके जळू शकतात, ज्ञान नाही! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन

नालंदा हे फक्त नाव नाही. नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान आहे. नालंदा एक मूल्य आहे, एक मंत्र आहे, एक अभिमान आहे, एक कथा आहे. आगीत पुस्तके जळू शकतात, परंतु आगीच्या ज्वाळात ज्ञान जळू शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Swapnil S

नवी दिल्ली : नालंदा हे फक्त नाव नाही. नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान आहे. नालंदा एक मूल्य आहे, एक मंत्र आहे, एक अभिमान आहे, एक कथा आहे. आगीत पुस्तके जळू शकतात, परंतु आगीच्या ज्वाळात ज्ञान जळू शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद‌्घाटन झाले. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ही उपस्थित होते.

ते म्हणाले की, तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर दहा दिवसात मला नालंदा विद्यापीठाच्या संकुलाचे उद‌्घाटन करायची संधी मिळाली हे मी भारताच्या विकासाच्या प्रवासाचे हे एक चांगले लक्षण म्हणून मी समजतो.

भारत हा जगाचे ज्ञानाचे केंद्र व आधुनिक व संशोधनासाठी पुन्हा अग्रेसर व्हावा, अशी आमची इच्छा आहे. २१ व्या शतकात भारत महत्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित करायचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात चमकदार कामगिरी केल्यानंतरच सर्व विकसित देश आर्थिक व सांस्कृतिकदृष्टया चांगली कामगिरी करू शकले. प्राचीन काळात भारतात नालंदा व विक्रमशीला विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचाच आनंद मिळत होता, असे त्यांनी सांगितले.

गेल्या दशकात भारतात १०० स्टार्टअप होते. आता तीच संख्या १.३० लाखांवर गेली आहे. भारतात पेटंट नोंदणी करण्याची व संशोधन प्रकाशित करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. संशोधन व नावीन्यपूर्णतेसाठी आम्ही १ लाख कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे, असे मोदी म्हणाले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, आम्ही नालंदा विद्यापीठाच्या पुर्नजीवनासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र जुन्या सरकारनी त्याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत.

विद्यापीठाच्या जुन्या अवशेषांना भेट

पंतप्रधानांनी १६०० वर्षे जुन्या नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांना भेट देऊन त्याची पाहणी केली.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन