राष्ट्रीय

खासदारांसोबत पंतप्रधानांच्या ‘भोजनगप्पा’

एल मुरूगन, रितेश पांडे, हिना गावित, कोन्याक, एन. प्रेमचंद्रन, सस्मित पात्रा, राम मोहन नायडू आणि जमयांग सेरिंग नामग्याल हे खासदार सहभागी झाले होते.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेच्या कामकाजानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेच्या कँटीनमध्ये जेवायला पोहोचले. कँटीनमध्ये जेवायची सुविधा पूर्वीच केलेली होती. या जेवणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या ८ खासदारांना आमंत्रण दिले होते. तासभर चाललेल्या या भोजनावेळी पंतप्रधानांनी खासदारांसोबत ‘भोजनगप्पा’ मारल्या.

पंतप्रधान मोदी यांनी ८ खासदारांसोबत शाकाहारी भोजन घेतले. मोदी यांनी भात, डाळ, खिचडी खाल्ली. तसेच तीळाचा लाडूही खाल्ला. एल मुरूगन, रितेश पांडे, हिना गावित, कोन्याक, एन. प्रेमचंद्रन, सस्मित पात्रा, राम मोहन नायडू आणि जमयांग सेरिंग नामग्याल हे खासदार सहभागी झाले होते. या खासदारांना वेगळ्या पद्धतीने निमंत्रण पाठवण्यात आले. पीएमओतून या खासदारांना कॉल करण्यात आला. पंतप्रधानांनी का बोलावले, याची माहिती कोणालाही नव्हती. जेव्हा सर्व खासदार पंतप्रधानांकडे गेले. तेव्हा त्यांनी हसत हसत सांगितले की, मी तुम्हाला शिक्षा देतो. त्यानंतर सर्व खासदारांना घेऊन ते कँटीनमध्ये घेऊन गेले व भोजन केले. गप्पांच्या ओघात खासदारांनी पंतप्रधानांना त्यांच्या अनुभवाबाबत विचारले. तेव्हा मोदी यांनी वैयक्तिक अनुभव सांगितले. तसेच त्यांना काही सूचनाही केल्या. या गप्पात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. एका खासदाराने मोदींना नवाझ शरीफ यांच्या भेटीबाबत विचारले. तेव्हा मोदी म्हणाले की, मी त्यादिवशी दोन वाजेपर्यंत संसदेत होतो. त्यानंतर अफगाणिस्तानसाठी रवाना झालो. माघारी येत असताना त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र एसपीजीने असे करण्यास नकार दिला. एसपीजीने विरोध करूनही मी नवाज शरीफ यांना फोन केला आणि रिसीव्ह करायला येणार का, असे विचारले. त्यानंतर पाकिस्तानात गेलो, असा किस्सा मोदी यांनी सांगितला.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस