राष्ट्रीय

मध्य प्रदेशात विद्यार्थ्यांनी केली प्राचार्याची हत्या

मध्य प्रदेशच्या छत्तरपूर जिल्ह्यात शुक्रवारी बारावीच्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या केली.

Swapnil S

छत्रपूर : मध्य प्रदेशच्या छत्तरपूर जिल्ह्यात शुक्रवारी बारावीच्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या केली.

महाविद्यालयात उशीरा आल्याने प्राचार्यांनी आरोपी विद्यार्थ्यांना जाब विचारला होता. त्यामुळे संतापलेल्या या विद्यार्थ्यांनी प्राचार्य एस. के. सक्सेना (५५) यांची गोळ्या घालून हत्या केली. या हत्येनंतर आरोपींनी पोबारा केला.

धामोरा सरकारी उच्च माध्यमिक शाळेच्या प्रसाधनगृहात सक्सेना यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सक्सेना यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे. देशी कट्ट्याने आरोपींनी गोळीबार केला. हा देशी कट्टा अजूनही पोलिसांनी हस्तगत केलेला नाही.

धामोरा सरकारी शाळेत पाच वर्षांपासून सक्सेना काम करत होते. सक्सेना हे उत्तम प्राचार्य होते. ते प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तीश: मार्गदर्शन करत होते. विद्यार्थ्यामध्ये सुधारणा न झाल्यास ते पालकांना बोलवून घेत होते, असे दुसरे शिक्षक हरिशंकर जोशी यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली