राष्ट्रीय

नीट-यूजी समुपदेशन प्रक्रिया लांबणीवर

नीट यूजी २०२४ परीक्षेसाठीचे समुपदेशन प्रक्रिया लांबणीवर पडली असून ती जुलै महिनाअखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: नीट यूजी २०२४ परीक्षेसाठीचे समुपदेशन प्रक्रिया लांबणीवर पडली असून ती जुलै महिनाअखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समुपदेशन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार होते, मात्र समुपदेशन अधिकाऱ्यांनी कोणतीही तारीख अथवा वेळापत्रक अधिसूचित केलेले नाही.

काही वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगीची पत्रे देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. अतिरिक्त जागा उपलब्ध करून दिली जाण्याचीही शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या महाविद्यालयांमधील जागांची निश्चिती झाल्यानंतर समुपदेशनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. कदाचित जुलै महिन्याच्या अखेरीस समुपदेशनाला सुरुवात होईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलण्यास नकार दिला होता.

सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली पेपरफुटीचा तपास करा - काँग्रेस

वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी पुन्हा घेण्यात यावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पेपरफुटीच्या सर्व घोटाळ्यांचा तपास करावा, अशी मागणी शनिवारी काँग्रेसने केली. एनसीईआरटी पुस्तके असो किंवा पेपरफुटी असो, आपली शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचे मोदी सरकारने ठरिवले आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले