पूजा खेडेकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा 
राष्ट्रीय

Pooja Khedkar : पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, २१ ऑगस्टपर्यंत अटकेपासून मिळालं संरक्षण

Pooja Pawar

नवी दिल्ली : माजी IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 'लाईव्ह अँड लॉ' ने दिलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने पूजाला २१ ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. खोटी कागदपत्र, बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे IAS ची नोकरी मिळवल्याचा आरोप पूजा खेडकर हिच्यावर आहे.

पूजा खेडकर हिने बनावट कागदपत्रांच्या आधारे IAS ची नोकरी मिळवली असल्याचा आरोप झाल्यावर यूपीएसीने देखील याबाबत तपास केला असता, तिने परीक्षेसाठी विविध नावांचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. तसेच केलेल्या तपासात पूजा खेडकर हीच दोषी आढळली असून फसवणूक केल्याबाबत यूपीएससीने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

पूजा खेडकरला पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यानंतर तिच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला. अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पूजाने दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. आता पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर २१ ऑगस्टला सुनावणी होणार असून तो पर्यंत पूजाच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आहे.

'लाईव्ह अँड लॉ' ने दिलेल्या माहितीनुसार अटकपूर्व जामीन अर्जाच्या याचिकेवर सुनावणी ही न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने केली. पूजा खेडकर यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सिद्धार्थ लुथरा हे होते तर यूपीएसीच्या वतीने नरेश कौशिक यांनी न्यायालयात बाजू मांडली. यावर न्यायालयाने पूजा खेडकरच्या तात्काळ अटकेची गरज नसल्याचं म्हणत तपास यंत्रणेला अटक न करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून पूजा खेडकरला अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

कोण आहे पूजा खेडकर?

पूजा खेडकर हि यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी असून परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिला पुण्यात IAS प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केलं होतं. IAS प्रशिक्षणार्थी असतानाच तिने खासगी गाडीवर अंबर दिवा लावला तसेच वरिष्ठांची केबिन बळकावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. यानंतर पूजा खेडकरवर अनेकजणांनी आरोप केले. तिच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर सुद्धा शंका उपस्थित करण्यात आली होती.

अखेर पुण्यात वाद झाल्याने तिची बदली ही वाशीमला करण्यात आली. मात्र तिच्यावर होणारे आरोप वाढत गेल्याने तिला मसुरीच्या यूपीएससीअकादमीत पुन्हा बोलावून घेण्यात आले. त्यानंतर पूजाने परीक्षेसाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये यूपीएससीला काही त्रुटी आढळल्या, मग तिच्यावर यूपीएसीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. वाशीममधून पूजा मसुरी येथे जाण्यासाठी निघाली खरी परंतू ती अद्याप मसुरीत दाखल झालेली नाही. सध्या तिचे प्रकरण न्यायालयात असून तिला पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला