संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

Putin India Visit : पुतिन मॉस्कोहून रवाना; संध्याकाळी ६.३५ ला पोहोचणार दिल्लीत, मोदींसोबत खास डिनर; बघा संपूर्ण वेळापत्रक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज म्हणजेच गुरुवार, ४ डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत येत आहेत. आयात शुल्कावरून भारताचे अमेरिकेशी संबंध कमालीचे बिघडलेले असताना पुतिन यांचा भारत दौरा होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

Krantee V. Kale

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज म्हणजेच गुरुवार, ४ डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत येत आहेत. आयात शुल्कावरून भारताचे अमेरिकेशी संबंध कमालीचे बिघडलेले असताना पुतिन यांचा भारत दौरा होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

पंतप्रधान मोदींकडून खास मेजवानी

युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच पुतिन भारतभेटीवर येत आहेत. या दौऱ्यासाठी पुतिन मॉस्को येथून रवाना झाले असून आज संध्याकाळी जवळपास ६ वाजून ३५ मिनिटांनी ते नवी दिल्लीत पोहोचतील, असे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्यासाठी खास मेजवानीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे दिल्लीत पोहोचल्यानंतर पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खासगी भोजनासाठी पोहोचतील. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी मॉस्कोला भेट दिली तेव्हा पुतिन यांनीही अशीच खासगी मेजवानीची व्यवस्था केली होती.

पुतिन यांचं शुक्रवारचं वेळापत्रक

पुतिन यांचा शुक्रवारचा दिवस अतिशय व्यस्त असेल आणि त्यांची दिवसाची सुरुवात राजघाटला भेट देऊन होईल. त्यानंतर राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल. पुढे पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा होईल. या बैठकीनंतर दोन्ही नेते एकत्र जेवण करतील. यानंतर पुतिन इंडिया–रशिया बिझनेस फोरममध्ये प्रमुख भाषण देतील, जिथे द्विपक्षीय गुंतवणूक आणि व्यापार सहकार्य वाढवण्यावर भर असेल. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ राजभोज दिला जाईल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष रात्री सुमारे ९:३० वाजता भारतातून प्रस्थान करण्याची शक्यता आहे.

व्यापार, आर्थिक सहकार्य आणि संरक्षण करारांवर लक्ष

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौर्‍यात व्यापार, आर्थिक सहकार्य आणि संरक्षण भागीदारी हे मुख्य केंद्रबिंदू असणार आहेत. पुतिन यांचे सहकारी युरी उशाकोव्ह यांच्या माहितीनुसार, या भेटीत एक संयुक्त निवेदन जाहीर होईल आणि विविध क्षेत्रांमध्ये अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. या करारांपैकी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे २०३० पर्यंत रशिया–भारत आर्थिक सहकार्याच्या धोरणात्मक क्षेत्रांच्या विकासाचा कार्यक्रम असेल.

२०२४ मध्ये दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापारात १२% वाढ झाली असून व्यापाराची एकूण रक्कम ६३.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. औद्योगिक सहकार्य, नवी तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, खनिज उत्पादन, शांततापूर्ण अवकाश संशोधन, वाहतूक आणि लेबर माइग्रेशन कार्यक्रम यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्यामुळे ही वाढ साध्य झाली आहे. आता भारत आणि रशिया राजकारण व सुरक्षा, अर्थव्यवस्था व वित्त, विज्ञान–तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृती अशा अनेक क्षेत्रांत आपली भागीदारी अधिक मजबूत करत आहेत.

भारतामध्ये आरटी टीव्ही चॅनेलचा शुभारंभ करणार पुतिन

शिखर बैठकीसोबतच पुतिन भारतात ‘रशिया टीव्ही’ची भारतीय वृत्तवाहिनीही लाँच करण्याची शक्यता आहे. ‘आरटी’ हे रशिया सरकारकडून चालवले जाणारे चॅनल आहे. तसेच ते इंडिया–रशिया बिझनेस फोरममध्ये भारतीय उद्योगपती आणि व्यवसाय नेत्यांशी संवाद साधतील. या माध्यमातून द्विपक्षीय गुंतवणूक, उद्योग ते उद्योग भागीदारी आणि दीर्घकालीन व्यापार संधींना चालना देण्यावर भर असेल.

मोदी–पुतिन बैठक: परस्पर विश्वास दृढ करण्याची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात अनेकदा दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, दोन्ही नेत्यांनी तियानजिन येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेच्या वेळीही एकमेकांची भेट घेतली होती. त्यांची ही नवी बैठक दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय राजकीय पातळीवर विश्वास अधिक दृढ करेल आणि बदलत्या जागतिक परिस्थितीत बहुपक्षीय सहकार्याला मोठी चालना, नवी दिशा देईल, अशी अपेक्षा आहे.

भारत-रशिया करार : रशियन लष्करी तळ भारताला वापरता येणार

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video

मरीन ड्राइव्ह ते ऑरेंज गेट भुयारी मार्ग: प्रकल्पाचा शानदार शुभारंभ; मेट्रो-३ मार्ग, पश्चिम-मध्य रेल्वे आणि ७०० हेरिटेज इमारतींखालून जाणार रस्ता

IND vs SA: ३५८ धावा करूनही का हरला भारत? कर्णधार राहुलने सांगितलं 'खरं' कारण, पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार?