भारताच्या GDP आकड्यांत घोटाळा; रघुराम राजन यांनी व्यक्त केली शंका 
राष्ट्रीय

भारताच्या GDP आकड्यांत घोटाळा; रघुराम राजन यांनी व्यक्त केली शंका

भारताचा विकास दर (जीडीपी) ७ टक्क्यांवर आहे. परंतु, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक विकासाच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा विकास दर (जीडीपी) ७ टक्क्यांवर आहे. परंतु, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक विकासाच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या जीडीपीच्या आकड्यात घोटाळा आहे, असे ते म्हणाले.

भारताच्या मजबूत आर्थिक वाढीचे आकडे वास्तव पूर्णपणे दर्शवतात का, असा सवाल त्यांनी केला आहे. कमी कॉर्पोरेट गुंतवणूक आणि घटती परदेशी गुंतवणूक हे सरकारी आकड्यांशी सुसंगत नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

राजन यांनी खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आर्थिक वाढीचे आकडे व व्यावसायिक व्यवहार यांच्यात सातत्याने तफावत आहे. जर अर्थव्यवस्था या वेगाने वाढत असती, तर तुम्ही निश्चितपणे अधिक गुंतवणुकीची अपेक्षा केली असती. नक्कीच काहीतरी गडबड आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत सुधारित जीडीपी मालिकेअंतर्गत मजबूत आर्थिक वाढीची नोंद करत आहे. यामध्ये २०२२-२३ हे नवीन बेस इयर (पायाभूत वर्ष) मानले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.७% ने वाढली, जी एका वर्षापूर्वी ७.१% होती. त्याचप्रमाणे, जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपीची वाढ ७.८% राहिली, तर त्याआधीच्या तिमाहीत ती ८% होती.

अर्थव्यवस्था वाढत असती तर भारताच्या कॉर्पोरेट गुंतवणुकीत तेजी का आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कॉर्पोरेट गुंतवणूक हे १० वर्षांपूर्वीही एक कोडे होते आणि आज ते कोडेच आहे. गेल्या १० वर्षांत सरकारी आकड्यांमध्ये आपण जी वाढ पाहिली आहे, कदाचित आपण त्या आकड्यांच्या तुलनेत कमी वेगाने वाढत आहोत, असे राजन म्हणाले.

तुमचा सरकारी जीडीपीच्या माहितीवर विश्वास आहे का? तेव्हा आरबीआयच्या माजी गव्हर्नरांनी सांगितले की, कंपन्या गुंतवणूक करत नसल्याचे हेच दर्शवते की, त्यांना बाजारात तशी मागणी दिसत नाही जी या वाढीच्या आकड्यांनुसार असायला हवी. यावरून हे स्पष्ट होते की, वाढीचे आकडे अर्थव्यवस्था प्रत्यक्षात कशी कामगिरी करत आहे हे पूर्णपणे सांगत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

महागाई भडकली! घाऊक महागाईचा दर ९.९२ टक्क्यांवर; किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर, अन्न, इंधन आणि उत्पादित वस्तू महागल्या

राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात UCC विधेयक मांडण्याच्या तयारीत - देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation : मनोज जरांगेंची आज मुंबईकडे कूच; आझाद मैदानावर एकटेच उपोषण करणार

संस्कृती आणि भाषांच्या संवर्धनातूनच ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ मजबूत होईल; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन

‘एस-४००’ ने ३१४ किमीवरील पाकिस्तानी विमान पाडले; संरक्षण खात्याच्या ताज्या अहवालात उघड