राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

संसदेचे तातडीचे अधिवेशन बोलवा - राहुल गांधी

संसदेचे विशेष अधिवेशन तत्काळ बोलावण्यात यावे, या विरोधकांच्या एकमताने केलेल्या आवाहनाचा मी पुनरुच्चार करतो. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम जाहीर केलेल्या युद्धविरामावर...

Swapnil S

नवी दिल्ली : पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामाबाबत सरकारने तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. तो कमी करायला शनिवारी युद्धविराम घोषित करण्यात आला. यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले की, "संसदेचे विशेष अधिवेशन तत्काळ बोलावण्यात यावे, या विरोधकांच्या एकमताने केलेल्या आवाहनाचा मी पुनरुच्चार करतो. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम जाहीर केलेल्या युद्धविरामावर चर्चा करणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला सामूहिक संकल्प प्रदर्शित करण्याची ही एक संधी असेल. मला खात्री आहे की तुम्ही या मागणीचा गांभीर्याने विचार कराल आणि लवकरच त्यावर निर्णय घ्याल, असे त्यांनी सांगितले.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल