राष्ट्रीय

'धर्मेंद्र प्रधानांना का हटवलेले नाही?'; CBSE मूल्यमापनातील त्रुटींवरून राहुल गांधींचा सवाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसईच्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ मूल्यमापन प्रक्रियेतील त्रुटींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रधान हे या प्रकरणात ‘सहभागी’ असल्याचा आरोप करत, पंतप्रधानांनी त्यांना केव्हाच पदावरून हटवायला हवे होते, असे गांधी यांनी म्हटले आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसईच्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ मूल्यमापन प्रक्रियेतील त्रुटींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रधान हे या प्रकरणात ‘सहभागी’ असल्याचा आरोप करत, पंतप्रधानांनी त्यांना केव्हाच पदावरून हटवायला हवे होते, असे गांधी यांनी म्हटले आहे.

कोएम्ट ही कंपनी पूर्वी 'ग्लोबारेना' नावाने कार्यरत असतानाही वादाच्या भोवऱ्यात होती, तरीही तिलाच ओएसएमचे कंत्राट का देण्यात आले असा सवाल राहुल यांनी एक्सवर पोस्ट लिहून केला. कंपनी चे व्यवस्थापन आणि मोदी सरकार यांच्यात नक्की काय संबंध आहे, असेही त्यांनी विचारले.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले आहेत. ही खरेदी प्रक्रिया भारत सरकारच्या नियमांनुसारच करण्यात आली आहे. जर काही अनियमितता आढळली, तर कोणाचीही गय केली जाणार नाही," असे प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video

आधी माफी मागितली, मग दानपेटी फोडली; नागपूरच्या शीतला देवी मंदिरातील चोरीचा VIDEO पाहून नेटकरी अवाक्!