राष्ट्रीय

मोदी पंतप्रधान होणार नाहीत! राहुल गांधी यांचे भाकीत

त्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ येत असून नरेंद्र मोदी आता देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

Swapnil S

कन्नौज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ येत असून नरेंद्र मोदी आता देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

सपाचे नेते अखिलेश यादव कन्नौज मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत गांधी बोलत होते. नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार नाहीत, असे आपण लिहून देण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले. काँग्रेस आणि सपा इंडिया आघाडीतील घटक पक्ष असून ते उत्तर प्रदेशात एकत्रित निवडणूक लढवत आहेत.

इंडिया आघाडीने गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली आहे, असे नमूद करताना राहुल गांधी यांनी, ‘भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा’, अशी उदाहरणे दिली. त्याचप्रमाणे द्वेषाच्या बाजारपेठेत प्रेमाची दुकाने उघडली आहेत, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडीने आपल्याला घेरले आहे, आपल्याला पराभव दिसत आहे, अदानी-अंबानी आपल्याला वाचवा, अशी मोदी यांची खिल्ली राहुल गांधी यांनी उडविली आणि हे दोन बडे उद्योगपती मोदी यांचे मित्र असल्याचे सूचित केले.

उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ

कोणत्या टेम्पोतून आणि कोणत्या प्रकारचा पैसा अदानी यांनी पाठविला ते त्यांना माहिती आहे, पंतप्रधानांना टेम्पोचा व्यक्तिश: अनुभव आहे, असेही गांधी म्हणाले. इंडिया आघाडीचे वादळ उत्तर प्रदेशात येत आहे, राज्यात भाजपला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार आहे, असे गांधी म्हणाले. कन्नौजमध्ये १३ मे रोजी मतदान होणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक