राष्ट्रीय

भर पावसात राहुल गांधींनी केले भाषण

वृत्तसंस्था

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भाषण केले होते. त्यानंतर निवडणुकीचे पारडे बदलले. म्हैसूरला रविवारी रात्री धो धो पाऊस कोसळत होता. त्या पावसात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हजारो लोकांमध्ये भाषण केले.

गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेचे लक्ष्य भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे भारतात पसरवल्या जाणाऱ्या विद्वेषाच्या विरोधात उभे राहणे हा आहे. ही यात्रा कन्याकुमार ते काश्मीरपर्यंत चालेल. कोणत्याही परिस्थितीत ती थांबणार नाही. आजचा पाऊसही आम्हाला थांबवू शकला नाही. नदीसारखी ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीरला जाईल. कडक ऊन, पाऊस किंवा थंडीतही ही यात्रा थांबणार नाही. ही नदीरूपी यात्रेत तुम्हाला विद्वेष किंवा हिंसा दिसणार नाही. तुम्हाला प्रेम दिसेल. कर्नाटकातील भाजप सरकार काय करते आहे, हे तुम्हाला सर्वांना दिसत आहे. भाजप व त्यांच्या मुख्यमंत्र्याने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम तोडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक