नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हे आर्थिक अन्यायाचे हत्यार बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही अब्जाधीश मित्रांना फायदा व्हावा, यासाठीच ‘जीएसटी’ची रचना करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला मंगळवारी आठ वर्षे पूर्ण झाली. राहुल गांधी यांनी यानिमित्ताने सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “८ वर्षांनंतरही मोदी सरकारने ‘जीएसटी’मध्ये कोणतीही सुधारणा केलेली नाही. हे आर्थिक अन्याय आणि कॉर्पोरेट मित्रत्वाचे एक क्रूर हत्यार आहे. गरीबांना शिक्षा करण्यासाठी, लघु-सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) चिरडण्यासाठी, राज्यांना कमकुवत करण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या काही अब्जाधीश मित्रांना फायदा देण्यासाठी ‘जीएसटी’ची रचना करण्यात आली होती.”