Congress/X
राष्ट्रीय

राहुल गांधी आज मणिपूर दौऱ्यावर, मोदींना संदेश देण्याचा प्रयत्न

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर भाषण करताना मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला होता. आता राहुल गांधी सोमवारी मणिपूरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या मे महिन्यापासून राहुल गांधी हे तिसऱ्यांदा मणिपूर दौऱ्यावर जात असल्याने आतातरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्या राज्याचा दौरा करावा, असा संदेश राहुल यांच्या दौऱ्यातून जाईल, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी-झोमी समाजांमध्ये गेल्या मे महिन्यापासून वांशिक संघर्ष पेटला आहे. आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यात राहुल गांधी जिरीबाम, चुराचंद्रपूर आणि मोइरांग येथील हिंसाचारग्रस्त लोकांना मदत छावण्यांमध्ये जाऊन भेटणार आहेत. या संघर्षाबाबत राहुल गांधी मणिपूरच्या राज्यपाल अनुसया उईके यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

या वांशिक संघर्षाचा जास्त फटका जिरीबामला बसला असल्याने राहुल गांधी यांच्या तेथील भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मे महिन्यापासून मणिपूरला एकदाही भेट दिली नसल्याचे काँग्रेस सातत्याने सांगत आहे. त्यामुळे आता तेथे जाऊन जनतेशी चर्चा करण्याची वेळ आली आहे, या जाणिवेतून राहुल गांधी तेथे जात आहेत. जे मोदी करीत नाहीत, ते आमचे नेते करीत आहेत, नरेंद्र मोदी परदेशांना भेटी देत आहेत, तर आमचे नेते राज्यातील जनतेसोबत आहेत, हा संदेशही देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था