राहुल गांधी  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

भारताला ‘डेड इकॉनॉमी’ म्हणणारे ट्रम्प सत्यच बोलले - राहुल गांधी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी (मृतावस्थेत) म्हटले. त्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी (मृतावस्थेत) म्हटले. त्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी सत्यच सांगितले, संपूर्ण जगाला माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था संपलेली आहे. भाजप सरकारने अदानीसारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी देशाची आर्थिक घडी उद्ध्वस्त केली आहे. पंतप्रधान मोदी आणि वित्तमंत्री वगळता सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांचा संदर्भ ट्रम्प यांच्या त्या विधानाशी होता, ज्यात ट्रम्प यांनी म्हटले होते की, मला काही फरक पडत नाही की रशिया आणि भारत त्यांची ‘डेड इकोनॉमी’ कशी बुडवतात. अमेरिकेने बुधवारी भारतातील उत्पादनांच्या आयातीवर २५ टक्के टॅरिफ लावल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयावरून भारतातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मोदींच्या मैत्रीचे हेच का ते फळ - प्रियांका

पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन मैत्री करत आहेत, पण त्याचे देशाला काय फळ मिळते, ट्रम्प यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले की, भारताला या मैत्रीचा काहीच उपयोग झालेला नाही, असे काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी म्हटले आहे. तर ‘नमस्ते ट्रम्प’ यांसारख्या शोभेच्या कार्यक्रमांमुळे भारताला काहीच फायदा झाला नाही. पाकिस्तान आणि चीननंतर अमेरिका आता तिसरी मोठी डोकेदुखी बनली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

भारत, रशियाने मृत अर्थव्यवस्था सोबतच बुडवाव्यात

अमेरिकेला भारतासोबत तुलनेत कमी व्यापार करावा लागतो’, असे त्यांनी म्हटले आहे. या कारणांमुळे भारत-अमेरिकेच्या व्यापारात अडथळे निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर २५% शुल्क लावण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी असेही सांगितले होते की, रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी केल्याबद्दल भारताकडून एक अनिश्चित दंडही आकारला जाईल.

एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल - ट्रम्प

देशाच्या भागीदारीतून होणाऱ्या या कामाचे नेतृत्व करेल, असे ट्रम्प म्हणाले.ट्रम्प यांनी भारतावर १ ऑगस्टपासून टॅरिफ लागू करणार असल्याची घोषणा बुधवारी केली. भारताने रशियाकडून तेल आयात आणि शस्त्रास्त्रे खरेदी सुरूच ठेवली, तर त्यांना दंडही आकारला जाईल, असा दुहेरी झटका डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेने पाकिस्तानसोबतचा एक करार पूर्ण केला. पाकिस्तानात तेलसाठे विकसित करण्यासाठी अमेरिका मदत करणार आहे.

राष्ट्रहित जपण्यासाठी उपाययोजना करणार - गोयल

राष्ट्रहित अबाधित ठेवण्यासाठी भारत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गोयल यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गुरुवारी निवेदन केले. या आयात शुल्काचे परिणाम काय होतील याचा अभ्यास केला जात आहे आणि सरकार शेतकरी, निर्यातदार, एमएसएमई आणि उद्योग समूहांशी सल्लामसलत करीत आहे. शेतकरी, कामगार, निर्यातदार यांच्या संरक्षणाला सरकारचे प्राधान्य आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास