राष्ट्रीय

अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानंतर युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा; म्हणाला, ''तिने माझे नाव...

केरळमध्ये कॉँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. मल्याळम अभिनेत्रीच्या आरोपांनंतर काँग्रेसचे आमदार राहुल ममकुटाथिल यांनी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी अदूर येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली.

नेहा जाधव - तांबे

केरळमध्ये कॉँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. मल्याळम अभिनेत्रीच्या आरोपांनंतर काँग्रेसचे आमदार राहुल ममकुटाथिल यांनी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी अदूर येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली. मात्र, त्यांनी पलक्कड येथील आमदार पदाचा राजीनामा दिला नाही.

अभिनेत्री रिनी जॉर्ज हिने बुधवारी (दि. २०) केरळमधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप केले होते. संबंधित नेत्याने तिला आक्षेपार्ह संदेश पाठवले तसेच पंचतारांकीत हॉटेलमध्ये बोलावले, असा दावा केला होता. एवढेच नाही, तर पक्षातील इतर महिलांनाही अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचा आरोप तिने केला होता.

रिनीने या आरोपांमध्ये कोणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र, भाजपने याचा संबंध काँग्रेस पक्षाशी जोडून पलक्कडचे आमदार राहुल ममकुटाथिल यांना लक्ष्य केले होते.

या सर्व प्रकरणावर राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सुरुवातीलाच सांगितले, की ''मी विरोधी पक्षनेते, तसेच केपीसीसी आणि एआयसीसी नेत्यांशी बोललो. त्यांनी माझ्याकडे राजीनामा मागीतलेला नाही. रिनी माझी जवळची मैत्रीण आहे. ती तशीच राहील. तिने माझे नाव घेतलेले नाही. माझा विश्वास आहे की मी आतापर्यंत कायद्याच्या आणि संविधानाच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलेले नाही.''

पुढे त्यांनी स्पष्ट केले, की ''राज्य सरकार तीव्र निषेध आणि आरोपांना तोंड देत असताना, काँग्रेस नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांनी अशा बाबींवर त्यांचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नये. म्हणूनच, मी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मला अजूनही वाटते की मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही." पत्रकार परिषदेच्या शेवटी त्यांनी आपला राजीनामा जाहीर केला.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व्ही. डी. सतीसन यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास त्यावर कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे.

'लाडकी बहीण' योजनेचा बेकायदा लाभ येणार अंगलट ; महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत होणार कारवाई

"हॉटेलमध्ये बोलवत होता..."; अभिनेत्रीचे नेत्यावर गंभीर आरोप, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-"मला...

राज ठाकरे अचानक 'वर्षा'वर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट; म्हणाले, ''आपण कबुतर, हत्ती यात अडकलो, पण...''

चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी; 'कोकण दर्शन' पासची सुविधा