प्रियांका गांधींचा मुलगा रेहान वाड्रा आणि अविवा बेगचा साखरपुडा चर्चेत; दोघांच्या क्लासी लूकने वेधले लक्ष 
राष्ट्रीय

प्रियांका गांधींचा मुलगा रेहान वाड्रा आणि अविवा बेगचा साखरपुडा चर्चेत; दोघांच्या क्लासी लूकने वेधले लक्ष

रेहानने अनेक वर्षांपासून असलेली त्याची मैत्रीण अविवा बेग हिच्याशी साखरपुडा केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर केले असून, त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

किशोरी घायवट-उबाळे

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याने आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. रेहानने अनेक वर्षांपासून असलेली त्याची मैत्रीण अविवा बेग हिच्याशी साखरपुडा केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर केले असून, त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर साखरपुड्याची घोषणा

शुक्रवारी (दि.२) शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोन फोटो आहेत. एक फोटो त्यांच्या साखरपुड्यातील असून दुसरा फोटो त्यांच्या लहानपणीचा आहे.

रेहानने पोस्टला “२९.१२.२५” अशी कॅप्शन दिली आहे. या पोस्टवर कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

साखरपुड्यात दोघांचा क्लासी लूक

साखरपुड्याच्या दिवशी रेहानने नेव्ही ब्लू सूट आणि मॅचिंग ट्राऊझर्स असा क्लासिक लूक केला होता तर अविवाने जांभळ्या रंगाची, सोनेरी नक्षी असलेली साडी नेसली होती. त्यावर मॅचिंग ब्लाऊज, डायमंड झुमके, हलकासा मेकअप असा एलिगंट लूक तिने केला होता.

रेहान वाड्रा कोण आहे?

रेहान वाड्रा हा केवळ राजकीय कुटुंबातील सदस्य नाही, तर तो एक व्हिज्युअल आर्टिस्ट आणि फोटोग्राफरही आहे. त्याने द डून स्कूल (The Doon School) डेहराडून येथून शिक्षण पूर्ण केले आहे. याच शाळेत त्याचे आजोबा राजीव गांधी आणि काका राहुल गांधी यांनीही शिक्षण घेतले होते.

यानंतर त्याने लंडनमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज युनिव्हर्सिटी ऑफ लंडन (SOAS University of London) येथे राजकारणाचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच कॅमेऱ्याची आवड असलेल्या रेहानने वाइल्डलाईफ, स्ट्रीट फोटोग्राफी आणि कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

अविवा बेग कोण आहे?

अविवा बेग ही आर्ट आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात सक्रिय असून तिने अटेलियर ११ (Atelier 11) या स्टुडिओ आणि प्रॉडक्शन हाऊसची सह-स्थापना केली आहे. तिचे काम विविध प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे.

राजकीय पार्श्वभूमी आणि क्रिएटिव्ह जग यांचा संगम असलेल्या या साखरपुड्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगताना दिसत आहे.

सोने दरात उसळी; चांदीही महागली; मौल्यवान धातू महिन्याच्या उच्चांकावर

नागपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचे कोठडीतही चोचले; नाश्त्याला पिझ्झा, झोपायला मऊ बिछान्याची मागणी

Mumbai : विक्रोळीत सख्ख्या भावांमध्ये रक्तरंजित राडा; मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या वादातून डबल मर्डर

रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास २ हजारांचा दंड; फेरीवाले, अनधिकृत प्रवेशावरही कडक कारवाई

ठाणे जिल्ह्यात 'कॅन्सर व्हॅन'द्वारे मोफत तपासणी; ऑगस्टभर जनजागृती मोहीम; तीन टप्प्यात मार्गदर्शन