रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास २ हजारांचा दंड; फेरीवाले, अनधिकृत प्रवेशावरही कडक कारवाई 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास २ हजारांचा दंड; फेरीवाले, अनधिकृत प्रवेशावरही कडक कारवाई

केंद्र सरकारने रेल्वे कायदा, १९८९ मधील महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा केल्या आहेत. या तरतुदींनुसार धूम्रपान, मद्यपान करून उपद्रव करणे, अनधिकृत प्रवेश, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे, अनधिकृत फेरीविक्री तसेच आक्षेपार्ह वस्तू रेल्वेत आणणे अशा गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : केंद्र सरकारने रेल्वे कायदा, १९८९ मधील महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा केल्या आहेत. या तरतुदींनुसार धूम्रपान, मद्यपान करून उपद्रव करणे, अनधिकृत प्रवेश, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे, अनधिकृत फेरीविक्री तसेच आक्षेपार्ह वस्तू रेल्वेत आणणे अशा गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास आता थेट २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. संबंधित प्रवाशाने दंड न भरल्यास न्यायालयाकडून ५,००० रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

रेल्वे कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार रेल्वेत मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना रेल्वे परिसरातून बाहेर काढण्याबरोबरच २४ तासांपर्यंत साधा कारावास, एक हजार रुपयांपर्यंत दंड, सामुदायिक सेवा किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वारंवार उपद्रव करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यांना तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा २,५०० रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. पहिल्या तीन उल्लंघनांसाठी प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर दंड न भरल्यास न्यायालयाकडून तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग