PM
राष्ट्रीय

तामिळनाडूत पावसाचे थैमान सुरूच

Swapnil S

चेन्नई : तामिळनाडूच्या दक्षिण भागात पावसाचे थैमान सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनतेला मदत करण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. द. तामिळनाडूतील थुतूकुडी, तिरुनेलवेली, तेनकासी येथील जनजीवन विस्कळीत झाले. या भागात बचावाचे कार्य वेगाने सुरू आहे. या पावसामुळे हजारो एकर जमिनीवरील पीक नष्ट झाले असून मालमत्ता हानी मोठ्या प्रमाणावर झाली. पाण्याच्या जोरदार प्रवाहात शेकडो वाहने वाहून गेली आहेत. 

भारतीय नौदल व तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरचा वापर करून मदतकार्यात सहभाग घेतला आहे. तामिळनाडू सरकारने लष्कर व हवाई दलाची अतिरिक्त मदत मागितली आहे. तसेच अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्क डाऊन झाले.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मंगळवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

दरम्यान, राज्यपाल आर. एन. रवी यांनी संरक्षण व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक राजभवनवर बोलावली होती. १०३९ मुलांसह ७४३४ जणांची सोय पुनर्वसन केंद्रात केली आहे. श्रीवैकुंठम येथे अडकलेले ८०० रेल्वे प्रवाशांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. लष्करातर्फे पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी मदत केली जात आहे. तसेच त्यांना वैद्यकीय मदत दिली जात आहे.

दिल्लीहून मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांसोबत आभासी बैठक घेतली. पुरात अडकलेल्या नागरिकांना वेगाने मदत पुरवावी, असे आदेश त्यांनी दिले.

पाण्याचा निचरा करायला अतिरिक्त पंप चेन्नईतून पाठवले आहेत. तसेच २०० बोटी पूर भागात तैनात केल्या आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त