सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत-चीन संबंध सुरळीत होणार नाहीत, असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनी संरक्षणमंत्र्यांना गुरुवारी ठणकावले.
चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांनी राजनाथ सिंह यांच्यासमोर सीमा वादाचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान करारांचे उल्लंघन होत असल्याने द्विपक्षीय संबंधांच्या मूलभूत तत्वांना धक्का बसत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधातील सर्व मुद्यांना द्विपक्षीय करारानुसार सोडवणे गरजेचे आहे.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी शांगफू हे दिल्लीत आले आहेत. भारत हा एससीओच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या लडाख सीमा वादानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारतीय दौरा आहे. या दोन्ही संरक्षणमंत्र्यांच्या चर्चेनंतर अजून कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर झालेले नाही.