‘चेक बाऊन्स’ प्रकरणात राजपाल यादवला कोर्टाचा दिलासा  
राष्ट्रीय

‘चेक बाऊन्स’ प्रकरणात राजपाल यादवला कोर्टाचा दिलासा

दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेते राजपाल यादव यांना ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात सोमवारी काही प्रमाणात दिलासा दिला. न्यायालयाने यादव यांच्या शिक्षेला १८ मार्चपर्यंत स्थगिती दिली असून त्यांची कारागृहातून सुटका करण्याची अनुमती दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेते राजपाल यादव यांना ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात सोमवारी काही प्रमाणात दिलासा दिला. न्यायालयाने यादव यांच्या शिक्षेला १८ मार्चपर्यंत स्थगिती दिली असून त्यांची कारागृहातून सुटका करण्याची अनुमती दिली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार मे. मुरली प्रॉजेक्ट्स प्रा. लि. यांच्या बँक खात्यामध्ये १.५ कोटी रुपये यादव यांनी जमा केल्याची खातरजमा केल्यानंतर न्या. स्वर्ण कान्त शर्मा यांनी वरील आदेश दिले. आम्ही तुमच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती देत आहोत, पुढील सुनावणीपर्यंत ही स्थगिती असेल, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

एका कौटुंबिक विवाह समारंभाला १९ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्यासाठी शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी विनंती यादव यांनी केली होती. न्यायालयाने यादव यांना पासपोर्ट जमा करण्याचे आणि अनुमतीविना देशाबाहेर न जाण्याचे आदेशही दिले आहेत.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले