राष्ट्रीय

राज्यसभा निवडणूक: उत्तर प्रदेशात भाजपची सरशी; हिमाचल, कर्नाटकमध्ये 'क्रॉसव्होटिंग'चा काँग्रेससह भाजपलाही फटका

राज्यसभेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉसव्होटिंग झाले.

Swapnil S

बंगळुरू, लखनऊ : राज्यसभेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉसव्होटिंग झाले. हिमाचल प्रदेशात भाजपकडून काँग्रेसला मोठा फटका बसला, मात्र कर्नाटकमध्ये काँग्रेसने तीन जाग जिंकल्या असून उत्तर प्रदेशात भाजपला मोठा विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशातील १०, कर्नाटकमधील चार आणि हिमाचल प्रदेशालील एका जागेसाठी मंगळवारी मतदान झाले. हिमचाल प्रदेशात झालेल्या क्रॉसव्होटिंगमुळे भाजपचे उमेदवार हर्ष महाजन हे विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी आणि महाजन यांना समसमान मते मिळाली, त्यामुळे चिठ्ठी टाकून महाजन हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

या निकालावरून काँग्रेसच्या नऊ आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्ट झाले. सध्या हिमाचल विधानसभेत काँग्रेसचे ४०, भाजपचे २५ आणि तीन अपक्ष असे आमदार आहेत.

उत्तर प्रदेशातही    निवडणुकीत मोठे नाट्य घडले. सपाचे मुख्य प्रतोद मनोज पांडे यांनी मतदान सुरू असतानाच पक्षाला रामराम केला. सपाचे नेते अखिलेश यादव यांनी बोलाविलेल्या बैठकीलाही पक्षाचे आठ आमदार गैरहजर होते.

कर्नाटकमध्ये चार जागांसाठी एकूणपाच उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत काँग्रेसचे अजय माकन, जी. सी. चंद्रशेखर आणिसय्यद हुसेन हे तर भाजपचे एन. के. भांडगे विजयी झाले. या निवडणुकी भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर यांनी माकन यांना मतदान केले. तर भाजपचे दुसरे आमदार हेब्बर हे गैरहजर राहिले.

सोमशेखर यांनी, आपण सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून काँग्रेसला मतदान केल्याचे सांगितले. तर हेब्बर यांनीही सद्सद्विवेकबुद्धील स्मरून गैरहजर राहिल्याचे सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी