राष्ट्रीय

दी गोवा हिंदू असोसिएशनचे रामकृष्ण नायक कालवश

Swapnil S

मडगाव : दी गोवा हिंदू असोसिएशनचे स्नेहमंदिर बांदोडा आणि कला विभाग मुंबई या संस्थेचे संस्थापक रामकृष्ण नायक यांचे रविवारी गोव्यातील फोंडा येथे निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.

गोव्‍यातील नाट्य चळवळ तसेच सामाजिक कार्याचे भीष्माचार्य अशी त्यांची ओळख होती. दी गोवा हिंदू असोसिएशन, गोमंत विद्या निकेतन, गोवा मराठी विज्ञान परिषद, समाज सेवा संघ, स्‍नेह मंदिर अशा अनेक संस्‍थांशी ते संबंधित होते. समाजकार्यांतून वयोमानामुळे निवृत्ती घेतलेल्‍या रामकृष्‍ण नायक यांनी ‍या बांदोडा-फोंडा येथील स्‍नेहमंदिरात आश्रय घेतला होता. मागचा काही काळ त्‍यांची प्रकृती खालावली होती. त्यांना फोंडा येथील सावईकर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ३ नोव्‍हेंबर १९२८ रोजी रामकृष्‍ण नायक यांचा जन्‍म झाला. गोव्‍यातील समाज कार्यातील अध्वर्यू म्‍हणून ओळखले जाणारे केशव नायक यांचे ते पुत्र होत. आपल्‍या वडिलांकडूनच त्‍यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस