राष्ट्रीय

देशाचे अनमोल 'रतन' हरपले! टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेणारे नेतृत्व, एका क्लीकवर बघा सगळा प्रवास

Swapnil S

नवी दिल्ली: जागतिक स्तरावर मोठ्या उद्योग समूहाचे नेतृत्व करतानाही कोणत्याही अब्जाधीशांच्या यादीत रतन टाटा यांचे नाव कधी नव्हते. तरीही उद्योगपती म्हणून संपूर्ण भारतात व जागतिक स्तरावर त्यांचा मोठा प्रभाव उमटला होता. जगातील १०० देश व सहा खंडांत त्यांच्या ३० कंपन्यांची नाममुद्रा पोहचली होती. यामागे रतन टाटा यांचे द्रष्टे नेतृत्व होते.

रतन टाटा यांचा जन्म १९३७ मध्ये पारशी कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील नवल व सुनी यांचा घटस्फोट झाला. आई- वडिलांचा घटस्फोट झाला, तेव्हा ते १० चर्षांचे होते. त्यांच्या आजीने त्यांचे संगोपन केले. शाळेत असताना ते स्वभावाने बुजरे होते. सर्वांसमोर भाषण देताना त्यांना भीती वाटायची. पियानो व क्रिकेटही ते शिकले. अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठात ते उच्च शिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी आर्किटेक्ट व स्ट्रक्चरल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांना अमेरिकेत स्थायिक व्हायचे होते, आयबीएम कंपनीने त्यांना नोकरीची ऑफरही दिली होती. पण, आजींची प्रकृती नाजूक असल्याने त्यांनी १९६२ मध्ये भारतात परतण्याचा निर्णय घेतला. टाटा सन्सचे तत्कालीन अध्यक्ष जेआरडी टाटा यांनी टाटा समूहात रतन टाटा यांना सामावून घेतले. शॉप फ्लोअरपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. १९७१ मध्ये टाटा समूहाच्या व्यवस्थापनात ते सहभागी झाले. १९९१ मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. दोन दशकांच्या आपल्या कारकीर्दीत रतन टाटा यांनी टाटा समू‌हाला जागतिक पातळीवर नेले. ब्रिटिश पोलाद कंपनी कोरस, लक्झरी कार निर्माती कंपनी जग्वार, लँड रोव्हर, जगातील दुसरी चहा उत्पादन कंपनी 'टेटली' हे ब्रँड टाटा समूहाने विकत घेतले. टाटा समूहाची त्यांनी ७० पट वाढ केली. मार्च २०२४ अखेर टाटा समूहाचा महसूल १६५ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. कॉफी, मीठ, सॉफ्टवेअर, स्टील, बांधकाम, ऊर्जा, विमान कंपनी, सुपर अॅप आदी सर्वच क्षेत्रात टाटा समूहा कार्यरत आहे. आयफोनच्या जुळणी व जोडणी प्रकल्पातही टाटा समूह शिरला आहे. आता भविष्यात कंपनीने चीप निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.

टाटा सन्सचे अध्यक्ष महणून काम करताना त्यांनी समूहाचा मोठ्या प्रमाणावर वेगाने विस्तार केला. लंडन येथील 'टेटली टी' ही कंपनी २००० मध्ये ४३१.३ दशलक्ष डॉलर, २००४ मध्ये १०२ दशलक्ष डॉलरचा डेवू मोटर्स, ११.३ अब्ज डॉलरची पोलाद कंपनी कोरस समूह व २.३ अब्ज डॉलर खर्च करून ब्रिटिश कार ब्रँड जग्वार व लँड रोव्हर कंपनी त्यांनी विकत घेतली. रतन टाटा यांना वेगाने कार व विमाने चालवण्याची आवड होती. तसेच स्कूबा डायव्हिंग करणेही त्यांना आवडत होते.

दातृत्वाची आवड

भारतातील सर्वांत मोठे उद्योगपती असलेल्या रतन टाटा यांचे दातृत्वही मोठे आहे. त्यांनी विविध सामाजिक संस्थांना मोठी मदत केली. १९७० च्या काळात आगा खान रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाला त्यांनी आर्थिक मदत केली. आता ती देशातील मोठी वैद्यकीय संस्था बनली आहे. त्यांनी देशातील अनेक नामवंत शिक्षण संस्था व सामाजिक संस्थांना मोठी मदत केली आहे.

उद्योग समूहातील आव्हान परतवले

१९९१ मध्ये टाटा उद्योगसमूहाचे नेतृत्व त्यांच्या हाती आल्यानंतर त्यांना त्यांच्या समूहातील कंपन्यांतील दिग्गजांकडून संघर्षांचा सामना करावा लागला. तरीही ते आव्हान त्यांनी यशस्वी पेलले. तसेच निवृत्तीनंतर ४ वर्षांनी २०१६ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्याशी संघर्ष झाला होता. अखेर मिस्त्री यांना पद सोडावे लागले. या दोन्ही संघर्षांत रतन टाटा हे विजयी झाले. टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरून रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्षपद त्यांच्या कुटुंबीयांबाहेर गेले. सायरस मिस्त्री यांनी घेतलेल्या काही निर्णयांबाबत आक्षेप नोंदवण्यात आले. अखेर मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ऑक्टोबर २०१६ मध्ये रतन टाटा हे उद्योगसमूहाचे तात्पुरते हंगामी अध्यक्ष झाले. जानेवारी २०१७ मध्ये टाटा समूहाची धुरा नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर रतन टाटा यांनी निवृत्ती स्वीकारली. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी नवीन उद्योजकांना मदतीचा हात दिला. अनेक स्टार्टअपमध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केली. ओला इलेक्ट्रिक, पेटीएम, स्नॅपडील, लेन्सकार्ट, झिमावे आदी कंपन्यांत त्यांनी गुंतवणुक केली.

सामान्य माणसासाठी बनवली सर्वात स्वस्त कार 'नॅनो'

मोटारसायकलवर पावसात भिजत असलेले एक कुटुंब पाहून रतन टाटा यांनी सामान्य माणसासाठी स्वस्त कार बनवण्याचा निर्धार केला व तशा सूचना टाटा मोटर्सच्या अभियंत्यांना केल्या. त्यातूनच टाटांची 'नॅनो' कार आकारास आली.

'एफ-१६ 'चे बनले सहवैमानिक

'एक-१६ 'वर उड्डाण करणारे रतन टाटा हे पहिले भारतीय नागरिक होते. अमेरिकन हवाई दलाच्या ब्लॉक ५० मधील लढाऊ विमानाचे ते सुमारे ४० मिनिटे सहवैमानिक होते.

जगभरात टाटा समूहाने पंख पसरले

टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी १८६८ मध्ये केली होती. ही भारतातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी असून तिच्या ३० कंपन्या जगातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये वेगवेगळ्या व्यवसायांत आहेत.

सकाळपासून सायंकाळपर्यंत आपला टाटांशी संबंध

२०२३-२४ मध्ये टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचा एकूण महसूल १३.८६ लाख कोटी रुपये होता, यातून १० लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळले. त्यांची उत्पादने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनातील एक भाग बनली आहेत. सकाळी उठल्यावर टाटा चहा पिण्यापासून दूरदर्शनवर टाटा बिंज सेवा वापरण्यापर्यंत आणि टाटा स्टीलची असंख्य उत्पादने आपल्या वापरात आहेत.

असा साकारला 'टाटा' द ग्लोबल ब्रँड

टाटा उद्योग समूहाने रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली जगभरात भरारी घेतली. टाटांचे हे धोरण अत्यंत धाडसी मानले जात होते. अनेकांनी त्यावेळी टाटांच्या या धाडसाविषयी संदेह व्यक्त केला होता. पण रतन टाटांनी १९९१ मध्ये समूहाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही वर्षातच युरोपातील एकापेक्षा एक बड्या कंपन्या खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या भरारीमुळे 'टाटा' हा केवळ एक प्रतिष्ठित भारतीय ब्रँड न राहता, तो खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय माणजे 'ग्लोबल ब्रँड' बनला. टाटा समूहाने टेटले ही ब्रिटिश चहानिर्मिती कंपनी, कोरस ही अँग्लो-डच पोलादनिर्मिती कंपनी, जग्वार लँड रोवर ही ब्रिटिश अलिशान मोटारनिर्मिती कंपनी अशा जगभरातील बडया कंपन्या आपल्या पंखाखाली घेतल्या.

रिलेशनशिपमध्ये असलेल्या सिमी ग्रेवालची भावनिक पोस्ट

एकेकाळी रतन टाटांसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनीही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सिमी ग्रेवाल आणि रतन टाटा यांना एकमेकांशी लग्न करायचे होते, पण काही कारणास्तव त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. सिमी म्हणाल्या, ते म्हणतात की तू गेलास. तुझे नुकसान सहन करणे खूप कठीण आहे. गुडबाय माझ्या मित्रा.

रतन टाटांचा तरुण जीवलग मित्र शांतनू नायडू

रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी मुंबईतील एनसीपीए येथे अंत्यदर्शनासाठी एका गाडीतून नेत असताना त्यांचा सर्वांत तरुण जीवलग मित्र शांतनू नायडू हा गाडीच्या पुढे राहून दुचाकीवरून पुढे जात रस्ता मोकळा करत होता. ३१ वर्षीय शांतनू हा रतन टाटा यांचा सर्वात विश्वासू सहाय्यक आहे. शांतनू आणि रतन टाटा यांची मैत्री खूपच खास होतो. दोघांच्या वयात ५५ वर्षाचे अंतर होते. मात्र, रतन टाटा यांनी ८४ वा वाढदिवस आपला लाडका मित्र शांतनू नायडूसोबत साजरा केला होता.

रतन टाटा यांचे सर्वात विश्वासू एन. चंद्रशेखरन

रतन टाटा यांना विविध पातळ्यांवर कार्य करत असताना एन. चंद्रशेखरन यांची मोलाची साथ लाभली आहे. एन. चंद्रशेखरन वांना रतन टाटांचे 'राईट हॅन्ड' माणून ओळखले जाते. राजन टाटा यांच्या निधनानंतर एन. चंद्रशेखरन चर्चेत आले आहेत, त्यांनी टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून करिअरची सुरुवात केली होती.

रतन टाटांनी व्यक्त केलेले विचार

■ इतरांचे अनुकरण करणारी व्यक्ती थोड्या काळासाठी यश मिळवू शकते. परंतु तो आयुष्यात जास्त प्रगती करू शकत नाही.

■ आपल्या चुका आपल्या एकट्याच्या आहेत, आपले अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नये. चुकीतून शिकून आयुष्यात पुढे जायला हवे.

■ मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना तुम्ही कधीही चिडवू नका. एक वेळ अशी येईल की तुम्हालाही त्याच्या हाताखाली काम करावे लागेल.

■ आयुष्य हे चढ-उतारांनी भरलेले आहे, त्याची सवय करून घ्यावी.

■ जर लोक तुमच्यावर दगडफेक करत असतील तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा

■ योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो

■ आव्हानांचा धैर्याने आणि चिकाटीने सामना करा, कारण ते यशाचा आधारस्तंभ आहेत

■ सर्वांत मोठी जोखीम म्हणजे जोखीम न घेणे. वेगाने बदलणाऱ्या जगात, एकच रणनीती अयशस्वी होऊ शकते आणि ती म्हणजे जोखीम न घेणे

जगभरात मिळालेले पुरस्कार

२००० मध्ये पद्मभूषण पुरस्कार

२००१ मध्ये ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचा मानद डॉक्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन पुरस्कार

२००४ साली उरुग्वे सरकारकडून ओरिएंटल रिपब्लिक ऑफ उरुग्वे पुरस्कार

२००४ मध्ये एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा मानद डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी पुरस्कार

२००६ साली आयआयटी मद्रासचा मानद डॉक्टर ऑफ सायन्स पुरस्कार

२००७ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सची ऑनररी फेलोशिप

२००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार

२०१६ साली फ्रेंच सरकारचा कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर

२०२३ सध्ये किंग चार्ल्सकडून ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार

२०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार

- इंग्लडची राणी एलिझाबेथकडून ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्कार तरी माडर ऑफ द ऑर्डर ऑफ द चिटिश एम्पायर पुरस्कार

- इटली सरकारचा ग्रँड अफिसर ऑफ द अंडर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक पुरस्कार

- येल युनिहर्सिटीचा लीजेंड इन लीडरशीप अवॉर्ड तसेच द एशियन अवॉर्ड फॉर बिझनेस पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड

अखेरचा 'टाटा' ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

Pune Porsche Car Accident: बाल न्याय मंडळाचे 'ते' दोन सदस्य बडतर्फ

लाल वादळ थंडावले...राफेल नदालने केली निवृत्तीची घोषणा, डेव्हिस चषक ठरणार अखेरची स्पर्धा

शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला तूर्तास दिलासा; कारवाई करणार नसल्याची ED ची हायकोर्टात हमी

हरयाणात पक्षहितापेक्षा नेत्यांचे हितसंबंधच वरचढ ठरले; विश्लेषण बैठकीत राहुल गांधी यांचे परखड मत