राष्ट्रीय

Gujarat Election : रवींद्र जडेजाला का आठवले बाळासाहेब ठाकरे? सोशल मिडीयावर शेअर केला व्हिडियो

प्रतिनिधी

गुजरातमध्ये आज निवडणुकीला सुरुवात झाली आहे. (Gujarat Election) दरम्यान, भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने ट्विटरवर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडियो शेअर केला आणि संपूर्ण गुजरातमध्ये चर्चा सुरु झाली. 'गुजरातमधून नरेंद्र मोदी गेले, तर गुजरात जाईल' अशा आशयाची एक भाषणाची क्लिप त्याने ट्विटरवर शेअर केली आहे. रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा ही उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्याने शेअर केलेल्या या व्हिडियोची चांगलीच चर्चा झाली.

व्हिडियोमध्ये काय म्हणाले आहेत बाळासाहेब ठाकरे?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील एक व्हिडीयो क्लिप शेअर केला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे गुजरातमधील नागरिकांना उद्देशून म्हणतात की, 'माझे हेच म्हणणे आहे की, नरेंद्र मोदी गेले तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजुला केलेत, तर तुमचं गुजरात गेले. हेच मी अडवानींजवळ बोललो आहे."

गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. २०१९मध्ये रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाने भाजपात प्रवेश केला होता. या निवडणुकीत रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. अशामध्ये रवींद्र जडेजाने तिच्या सोबतीने प्रचार सभांमध्ये सहभाग घेतला आहे.

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

Video : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला लागला बॉल, पुण्यातील ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य