राष्ट्रीय

EMI होणार कमी! RBI कडून मोठा दिलासा; रेपो रेटमध्ये केली कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने व्याजदरात कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुमच्या गृह, वैयक्तिक, वाहन कर्ज आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. तथापि, २०२५-२६ मध्ये GDP वाढीचा अंदाज कमी करण्यात आला आहे.

Krantee V. Kale

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने व्याजदरात कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे. आरबीआयने रेपो दरात ०.२५ बेसिस पॉइंट्सनी कपात केली आहे. आता रेपो दर घसरून ६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुमच्या गृह, वैयक्तिक, वाहन कर्ज आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गुरूवारी ही महत्त्वाची घोषणा केली.

आरबीआयच्या नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या चलनविषयक धोरण समिती(MPC)च्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कपात केल्याची माहिती दिली आहे. ही बैठक ७ एप्रिल रोजी सुरू झाली होती. २०२५ मध्ये सलग दुसऱ्यांदा आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटने कपात करत प्रमुख व्याजदर ६.२५% केला होता. मे २०२० नंतरची म्हणजे पाच वर्षांनंतरची ही पहिली दर कपात होती.

जीडीपी वाढीचा अंदाज केला कमी

एमपीसीने २०२५-२६ मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. २०२५-२६ मध्ये किरकोळ महागाई ४ टक्के राहण्याची अपेक्षा आहे, असे एमपीसीने म्हटले आहे. यावेळी बोलताना आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी जागतिक आर्थिक तणाव आणि व्यापार युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, ट्रंम्प यांच्या टॅरिफच्या घोषणांदरम्यान रेपो रेटमध्ये कपात करण्याचं रिझर्व्ह बँकेचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.

Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ

Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात

Mumbai : मोनोरेल यंदाही यार्डातच; सुरक्षेबाबत MMRDA सावध

SpiceJet च्या अडचणीत वाढ; विमान रद्द केल्याप्रकरणी DGCA चा दणका, नियमभंगाच्या आरोपांवर नोटीस जारी

Mumbai : औषधांसाठी हवेत १२०० कोटी, मिळतात ३०० कोटी; पालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा, नगरसेवकांनी BMC ला धारेवर धरले