राष्ट्रीय

बिहारमध्ये निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती

बसमध्येच नशा करून बसचालक, कंडक्टरने व इतरांनी गैरकृत्य केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले

वृत्तसंस्था

बिहारच्या बेतियामध्ये एका १६ वर्षीय मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. ड्रायव्हर-कंडक्टरसह तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. बेतिया बसस्थानकापासून १०० मीटर अंतरावर ही घटना घडली असून, पीडित मुलीची प्रकृती सध्या गंभीर आहे. तिच्यावर पोलीस सुरक्षेत उपचार सुरू आहेत.

पीडित मुलगी मंगळवारी दुपारी मोतिहारीहून बेतिया (चनपटीया) येथे परतत होती. यादरम्यान बस कंडक्टरने तिला गुंगीचे औषध दिले. संध्याकाळी उशिरा बेतिया बस स्टँडवर आल्यानंतर सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. चालक गाडी घेऊन स्टँडपासून सुमारे १०० मीटर अंतरावर गेला आणि एका निर्जन ठिकाणी बस थांबवली. यानंतर चालक, कंडक्टरसह तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केला. ती बेशुद्ध पडल्यावर तिघे बस सोडून पळून गेले. यानंतर पोलिसांची पेट्रोलिंग गाडी रस्त्यावरून जात होती. संशयावरून पोलिसांनी बसची झडती घेतली असता मुलगी गंभीर अवस्थेत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात नेले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने आपल्यावरील आपबिती सांगितली. बसमध्येच नशा करून बसचालक, कंडक्टरने व इतरांनी गैरकृत्य केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.

याप्रकरणी बेतिया सदरचे एसडीपीओ मुकुल परिमल पांडे यांनी या घटनेला दुजोरा दिला. मुलीवर उपचार सुरू असून, याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे; मात्र पोलिसांनी रात्री छापा टाकून आरोपी चालक व हेल्परला ताब्यात घेतले आहे.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?