राष्ट्रीय

रीलसाठी काहीही! थेट रेल्वे रुळावर झोपला युवक, वरुन गेली भरधाव ट्रेन अन्... ; बघा व्हायरल Video

सोशल मीडियाच्या आजच्या जगात व्हिडिओ बनवून अल्पावधीत प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाताना दिसतात, अनेकजण तर जीवाचीही पर्वा करत नाहीत.

Krantee V. Kale

सोशल मीडियाच्या आजच्या जगात व्हिडिओ बनवून अल्पावधीत प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाताना दिसतात, अनेकजण तर जीवाचीही पर्वा करत नाहीत. उत्तर प्रदेशमधून एका तरुणाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील उन्नाव रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या कुशुंबी स्टेशनवरील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण जीव धोक्यात घालून हातात मोबाईल घेऊन थेट रेल्वे रुळावर झोपल्याचं दिसतंय. काही क्षणांत समोरुन एक भरधाव ट्रेन येते आणि त्याच्यावरुन निघून जाते. सुदैवाने तरुणाला काहीही जखम होत नाही. ट्रेन जाताच हा तरुण उठून उभा राहतो, कपडे झटकतो आणि खूप मोठं महान कार्य केल्याच्या अविर्भावात कॅमेऱ्याकडे बघतो.

७ एप्रिल रोजी समोर आलेला हा व्हिडिओ व्हायरल होताच जीआरपीने कारवाई करीत तरुणाला अटक केली आहे. रणजीत चौरसिया असे तरुणाचे नाव असून तो हसनगंजमधील रहिवासी आहे. रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणे आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. "त्याने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आणि ही चूक पुन्हा करणार नसल्याचे सांगितले आहे. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. आरोपी १९ वर्षांचा आहे", असे जीआरपीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी लोकांना असे व्हिडिओ बनवू नका असे आवाहन केले आणि भविष्यात कोणीही अशाप्रकारचे जोखीम पत्करणारे व्हिडिओ केल्यास, स्टंटसाठी रेल्वे ट्रॅकवर आल्यास कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल", असा इशाराही दिला.

बघा व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, हा व्हिडिओ एडिट करुन अपलोड करण्यात आल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग