PTI
राष्ट्रीय

Kolkata Woman Doctor Rape-Murder: डॉक्टरांचा तडजोडीस नकार; पेच कायम

आपल्या प्रमुख मागण्या धसास लावण्यासाठी गेल्या जवळपास महिनाभरापासून संप पुकारलेल्या डॉक्टरांची शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष आंदोलनाच्या ठिकाणी अचानक जाऊन भेट घेतली.

Swapnil S

कोलकाता: आपल्या प्रमुख मागण्या धसास लावण्यासाठी गेल्या जवळपास महिनाभरापासून संप पुकारलेल्या डॉक्टरांची शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष आंदोलनाच्या ठिकाणी अचानक जाऊन भेट घेतली. आपण येथे तुमची दीदी म्हणून आलो आहोत, मुख्यमंत्री म्हणून नव्हे. तुम्ही रात्रभर पावसात आंदोलन करीत आहात. त्यामुळे आपल्याला रात्रभर झोप लागली नाही. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे वचन देण्यासाठी आपण आलो आहोत, असे ममतांनी संपकरी डॉक्टरांना आर्जव केले आणि समस्या सोडविण्याचा हा आपला अखेरचा प्रयत्न असेल, असेही त्या म्हणाल्या. मात्र जोवर चर्चा होत नाही तोपर्यंत मागण्यांबाबत तडजोड केली जाणार नाही. असे संपकरी डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

गुरुवारी ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. परंतु, थेट प्रेक्षपणाच्या अटीवर अडून राहिलेल्या आंदोलकांनी ममता बॅनर्जीची भेट घेतली नाही. दोन तास वाट पाहिल्यानंतर ममता बॅनर्जी निघून गेल्या. शनिवारी पुन्हा त्या आंदोलनस्थळी पोहोचल्या.

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण आणि आरोपीला शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी रात्रभर पावसातच आंदोलकांनी आंदोलन केल्याने शनिवारी ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आंदोलकांची भेट घेतली.

माझे पद मोठे नाही, लोकांची पदे मोठी आहेत. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू, असे वचन द्यायला मी आज येथे आले आहे, असे त्या म्हणाल्या. सर्व सरकारी रुग्णालयांतील रुग्ण कल्याण समित्या बरखास्त करण्यात आल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली. समस्या सोडवण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना डॉक्टर अनिकेत महतो म्हणाले, मुख्यमंत्री हे राज्याचे पालक आहेत. त्यांनी येथे भेट दिली त्याचे स्वागत करतो. आम्ही ३५ दिवस रस्त्यावर आहोत. आधी चर्चा केली असती, आम्ही कधीही आणि कुठेही बोलण्यास तयार आहोत. मात्र आमच्या पाच कलमी मागण्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्हाला कामावर परत यायचे आहे. जोवर चर्चा होत नाही, तोवर मागण्यांबाबत तडजोड केली जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी दिला आहे. कोलकाता येथील राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुख्यालयातील आरोग्य भवनाबाहेर डॉक्टर तळ ठोकून आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये चांगली सुरक्षा आणि आर. जी. कर हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी या मागण्यांचा समावेश आहे.

हे उत्तर प्रदेश नाही!

तुम्ही कामावर परत आलात, तर तुमच्या मागण्यांचा अभ्यास करून अधिकाऱ्यांशी बोलेन, असे वचन देते. तुमच्या मागण्यांकडे मी संवेदनशीलतेने लक्ष देईन. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मला थोडा वेळ द्या. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर मी कारवाई करेन, असेही त्या म्हणाल्या. मी तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. आम्ही उत्तर प्रदेश पोलीस नाही, आम्हाला तुमची गरज आहे. विचार करा आणि निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

Pune Accident : कोरेगाव पार्क परिसरात भीषण दुर्घटना; भरधाव कारची मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक, गाडीचे झाले तुकडे, २ भावांचा जागीच मृत्यू |Video

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

जयपूर हादरले! सहावीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; शाळेतल्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, CCTV कॅमेऱ्यात थरारक घटना कैद

Women’s World Cup : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महिला विश्वचषक फायनलसाठी हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द

मांडवा जेट्टी कोसळण्याच्या उंबरठ्यावर? प्रवाशांचा जीव धोक्यात; सागरी मंडळाचे दुर्लक्ष