राष्ट्रीय

संसदेच्या आठ समित्यांची पुनर्रचना

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी ८ संसदीय स्थायी समित्यांची पुनर्रचना केली आहे. पुनर्रचनेत केलेले बदल १३ सप्टेंबरपासून लागू होतील. काँग्रेसचे राज्यसभा खासदार पी चिदंबरम यांची गृह खात्याच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते पी भट्टाचार्य यांच्या निवृत्तीमुळे गृह खात्याच्या समितीवरील जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागी चिदंबरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चिदंबरम यांची गृह खात्याच्या समितीवर नियुक्ती अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा ही समिती तीन विधेयकांवर चर्चा करणार आहे. ही तिन्ही विधेयके फौजदारी कायद्याशी संबंधित आहेत. ही तीन विधेयके आयपीएस १८६०, भारतीय पुरावा कायदा १८७२ आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ ची जागा घेतील. हे भारतीय न्यायिक संहिता, भारतीय पुरावे आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता बदलतील.

काँग्रेसचे लोकसभा खासदार अधीर रंजन हे देखील गृह खात्याच्या समितीचे सदस्य आहेत. एकूण २४ स्थायी समित्या आहेत. प्रत्येक समितीमध्ये ३१ सदस्य आहेत. त्यापैकी २१ सदस्य लोकसभेचे आणि १० राज्यसभेचे आहेत. चिदंबरम यांच्याशिवाय काँग्रेसचे लोकसभेचे खासदार अधीर रंजन हे देखील होम पॅनेलचे सदस्य आहेत. या पॅनलचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजलाल आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस