X - @siddaramaiah
राष्ट्रीय

कर्नाटकात मुस्लिम कंत्राटदारांना आरक्षण; भाजपची जोरदार टीका

बंगळुरू : कर्नाटक सरकारने सार्वजनिक खरेदीतील पारदर्शकता कायद्यातील सुधारणांना मान्यता दिली असून मुस्लिम कंत्राटदारांना कंत्राटांमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.

Kkhushi Niramish

बंगळुरू : कर्नाटक सरकारने सार्वजनिक खरेदीतील पारदर्शकता कायद्यातील सुधारणांना मान्यता दिली असून मुस्लिम कंत्राटदारांना कंत्राटांमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. हे दुरुस्ती विधेयक चालू विधानसभा अधिवेशनातच मांडता येईल. यापूर्वी ७ मार्च रोजी सिद्धरामय्या यांनी सरकारी कंत्राटांपैकी ४ टक्के जागा मुस्लिमांसाठी राखीव ठेवल्या जातील, असे म्हटले होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर भाजपने टीका केली. कर्नाटक सरकारचा अर्थसंकल्प औरंगजेबापासून प्रेरित असल्याचे भाजपने म्हटले आहे. मंत्रिमंडळाने हेब्बल येथील कृषी विभागाची ४.२४ एकर जमीन आंतरराष्ट्रीय फ्लॉवर ऑक्शन बंगळुरूला दोन वर्षांसाठी भाडेमुक्त तत्वावर देण्याच्या प्रस्तावावरही चर्चा केली. जानेवारीमध्ये झालेल्या आगीच्या घटनेनंतर 'बंगळुरू बायोइनोव्हेशन सेंटर'मध्ये पुनर्बांधणी आणि उपकरणे बदलण्यासाठी ९६.७७ कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजुरी देण्याबाबतही चर्चा झाली.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास