राष्ट्रीय

Kerala Train Fire : केरळ ट्रेन जाळपेाळ आरोपी शाहीनबागचा !

नवशक्ती Web Desk

केरळमधील कोझीकेाडे येथे अलपुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेस जाळपोळ प्रकरणी रत्नागिरीत अटक झालेला तरुण चक्क दक्षिण दिल्लीतील कुख्यात शाहीनबागेचा रहिवासी असल्याचे उघडकीस आले आहे. महाराष्ट्र एटीएस आणि केरळ पेालिसांच्या संयुक्त कारवाईत बुधवारी २४ वर्षांच्या शाहरुख सैफीला अटक करण्यात आली होती. त्यामुळे केरळची घटना सुनियोजित घातपात तर नाहीना, यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

शाहरुख सैफी हा मितभाषी, बुजरा आणि एकांतप्रिय तरुण आहे. १२ वी पास झाल्यानंतर तो वडील फक्रुदिन सैफी यांना त्यांच्या नेाएडा सेक्टर ३१ येथील सुतारकाम दुकानात मदत करीत असे. आपले काम बरे की आपण बरा अशी वृत्ती असलेला शाहरुख कामाला जाण्याव्यतिरिक्त कधीही घराबाहेर पडत नसे. गेली १५ वर्षे त्याचे कुटुंब शाहीनबागेत राहात आहे. काही शेजाऱ्यांनी तर त्याला कधी घराबाहेर पाहिले नाही. तसेच तेा कधीही दिल्ली बाहेर गेला नाही किंवा कोणत्याही संघटनेशी त्याचे संबंध नाहीत असे शाहरुखच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. ३१ मार्चला तो दुकानात जातो म्हणून घराबाहेर पडला हेता. पण तो दुकानात पेाहेाचलाच नाही. तीन दिवस वाट पाहून कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार नेांदवली होती. मात्र पेालिसांकडून त्यांच्या मुलाला रत्नागिरी येथे अटक झाल्याचे सांगण्यात आले. कोझिकोडे येथे ट्रेनला केलेल्या जाळपेाळीत एका मुलासह तीन जणांचा बळी गेला होता. पेालीस आता सैफीचा इतिहास आणि संभाव्य जाळ्याचा तपास घेत आहेत. या जाळपेाळीत मुख संशयित असलेल्या शाहरुखने अनेक सहप्रवाशांना जाळल्याचा आरेाप आहे. त्याने आधी प्रवाशांवर ज्वालाग्राही द्रव फेकला व नंतर आग लावली असा आरोप आहे. प्राथमिक तपासात शाहरुखची कोणत्याही संघटनेशी लिंक आढळल्यास तपासात 'एनआयए'ची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस