मणिपुरचे राज्यपाल अजय भल्ला 
राष्ट्रीय

लुटलेली शस्त्रास्त्रे सात दिवसांत परत करा! राज्यपालांचे जनतेला आवाहन

मणिपुरात लुटलेली किंवा अवैध शस्त्रास्त्रे येत्या सात दिवसांत परत करावीत, असे आवाहन राज्यपाल अजय भल्ला यांनी केले आहे.

Swapnil S

इम्फाळ : मणिपुरात लुटलेली किंवा अवैध शस्त्रास्त्रे येत्या सात दिवसांत परत करावीत, असे आवाहन राज्यपाल अजय भल्ला यांनी केले आहे.

राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाल्यानंतर राज्यपालांनी जनतेला हे आवाहन केले. मणिपुरात मे २०२३ पासून हिंसाचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे.

राज्यपाल भल्ला म्हणाले की, गेल्या २० महिन्यांपासून राज्यातील जनतेला मोठा त्रास होत आहे. राज्यातील सर्वच जाती-धर्माच्या जनतेला अपील करतो की, लुटलेली व अवैध शस्त्रास्त्रे येत्या सात दिवसांत जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सुरक्षा दलाच्या तळावर परत करावीत. ही शस्त्रास्त्रे परत करणे हे शांतता प्रस्थापित करण्याचा एक भाग असू शकते.

शस्त्रास्त्रे परत न केल्यास कारवाई

निर्धारित वेळेत ही शस्त्रास्त्रे परत केल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र, त्यानंतर कोणाकडे शस्त्रास्त्रे सापडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा भल्ला यांनी दिला.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती