(Photo -X/DRI)
राष्ट्रीय

सुपारी आयातीत २,५०० कोटींचा घोटाळा; महसूल गुप्तवार्ताकडून अखेर पर्दाफाश

साऊथ एशिया फ्री ट्रेड एरिया कराराचा गैरफायदा घेऊन दक्षिण-पूर्व आशियाई देशांतून आणलेली सुपारी बांगलादेशी बनावटीची असल्याचे खोटे सांगून भारतात आयात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : साऊथ एशिया फ्री ट्रेड एरिया कराराचा गैरफायदा घेऊन दक्षिण-पूर्व आशियाई देशांतून आणलेली सुपारी बांगलादेशी बनावटीची असल्याचे खोटे सांगून भारतात आयात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे.

वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयने केलेल्या तपासात सुपारीच्या बेकायदेशीर आयातीमुळे २,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुलाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

भारतात सुपारीच्या आयातीवर १०० टक्के मूलभूत सीमाशुल्क लागू होते. परंतु, एरिया कराराअंतर्गत पात्र असलेल्या सुपारीच्या आयातीवर सीमाशुल्कात पूर्ण सूट मिळते. बांगलादेशात उत्पादन झालेल्या सुपारीला एरिया कराराच्या नियमांनुसार आयात केल्यास ही सूट मिळण्याचा अधिकार आहे.

डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, काही सिंडिकेट्स सुपारी आयातीवर एरिया कराराच्या सवलतींचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करत असल्याचे समोर आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...